प्रकल्पग्रस्तांतर्फे काळा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 01:13 AM2018-04-25T01:13:41+5:302018-04-25T01:13:41+5:30
विदभार्तील सर्वात मोठे गोसेखुर्द धरणाचे २२ एप्रिल १९८८ ला उदघाटन झाले होते. तसेच येथील बाधीतांना प्रकल्पग्रत हे नविन नाव मिळाले. या नावाने किती हाल अपेक्षा झाल्या. परिणामी गोसेखुर्द धरणाचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विदभार्तील सर्वात मोठे गोसेखुर्द धरणाचे २२ एप्रिल १९८८ ला उदघाटन झाले होते. तसेच येथील बाधीतांना प्रकल्पग्रत हे नविन नाव मिळाले. या नावाने किती हाल अपेक्षा झाल्या. परिणामी गोसेखुर्द धरणाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच प्रकल्पग्रस्तांचा शेतकरी संघर्ष समिती व विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने नविन पिपरी येथे प्रकल्पग्रस्तांतर्फे काळा दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
कित्येक लोक प्रकल्पग्रस्त, भूमिहीन, बेघर, व बेरोजगार झाले त्यांनाच माहीत आहे हालअपेक्षा म्हणून दि.२२ एप्रिल २०१८ रोजी गोसेखुर्द धरणाला ३० वर्षे पूर्ण झाली आहेत.
त्याच त्यामुळे गोसेखुर्द धरणाचा वाढदिवस साजरा करते वेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे भंडारा जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष प्रविण भोंदे यांचे हस्ते केक कापुन वाढदिवस साजरा करण्यात आला.
त्यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा तालुका अध्यक्ष भाऊ कातोरे, राजेंद्र बावने, माजी पंचायत समितीचे माजी उपसभापती निशांत मेश्राम, संतोष कातोरे, अनिरुद्ध गजभिये, प्रज्योत घुले, प्रदीप अतकरी, विजय कांबळे,निखिल सावरकर, मुजिब शेख, किशोर लांडगे, हरी पडोळे, दुर्गेश तिजारे, भुषण कातोरे, आकाश वासनिक, योगेश कातोरे मिथुन भोयर, शैलेश कारेमोरे, अनिकेत घुले व अदि कार्यकर्ते उपस्थित होते त्यावेळी राज्य सरकारने प्रकल्प ग्रस्तांना विविध दिलेले आश्वासन सुद्धा फोल ठरल्याने या सरकार विरोधात काळ्या पाट्या डोक्यावर लावून निषेध व्यक्त करण्यात आला.
गोसीखुर्द इंदिरा सागर जलाशयात भरपूर जलसाठा आहे. दोन्ही मुख्य कालव्यातून नियमित पाणी प्रवाहित करून पाणी टंचाई ला आळा घालता येईल, असेही यावेळी सुचविण्यात आले.