खाऊंच्या पैशातून भिक्षेकरूंना ब्लँकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 11:47 PM2017-12-02T23:47:33+5:302017-12-02T23:47:58+5:30

ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे काही देणे लागते, हा उदात्त हेतू समोर ठेवून जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी खाऊंचे पैसे गोळा करून भिक्षेकरू वृद्धांना ब्लँकेट वाटप केले.

Blanket to beggars | खाऊंच्या पैशातून भिक्षेकरूंना ब्लँकेट

खाऊंच्या पैशातून भिक्षेकरूंना ब्लँकेट

Next
ठळक मुद्देजनता विद्यालयातील विद्यार्थ्यांचा उपक्रम : वृद्धांच्या डोळ्यात आनंदाश्रू

आॅनलाईन लोकमत
तुमसर : ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे काही देणे लागते, हा उदात्त हेतू समोर ठेवून जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी खाऊंचे पैसे गोळा करून भिक्षेकरू वृद्धांना ब्लँकेट वाटप केले.
भिक्षा मागणाºया वृद्धांच्या डोळ्यात यावेळी पाणी तरळले. विद्यार्थी घडविणाºया शिक्षकांचे त्यांनी आभार माणून विद्यार्थ्यांना आशिर्वाद दिला. विद्यार्थ्यांनी नंतर त्या वृद्धांना नाश्ता दिला. या दृष्टयाने रस्त्यावरील येणाºया जाणाºयांचे लक्ष वेधून घेतले.
सध्या कडाकीची थंडी पडत आहे. जनता विद्यालयाच्या मार्गावर ये-जा करतानी विद्यार्थ्यांनी रस्त्याशेजारी भिक्षेकरू थंडीत कुडकुडतांना दिसले. विद्यार्थ्यांनी ही बाब शिक्षकांना सांगितली. शाळेतील विद्यार्थी मंडळात निर्णय चिमुकल्या विद्यार्थ्यांनी खाऊंचे पैसे गोळा करून शिक्षेकरूंना ब्लँकेट घेऊन वितरित करण्याचा निर्णय घेतला. पैसे गोळा झाले. नंतर शिक्षकांनी दुकानातून ब्लँकेट खरेदी करून दिले.
२ डिसेंबरला शनिवारी सकाळी ८.३० वाजता सकाळच्या शाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी शनि मंदिर समोर बसलेल्या भिक्षेकरू सिताराम सहारे, विनायक चिचखेडे, लिला कावळे, कली घरडे, तुळसा भिवगडे, दुर्गा वैद्य, रमेश कावळे, सुनिता डुंभरे आदींना ब्लँकेट वितरीत केले. तेव्हा विद्यार्थी व भिक्षेकरू यांचे डोळे पाणावले. इतरांचे दु:ख समजणाºयांना जिवनात यश मिळते, असे शब्द गरीब भिक्षेकरूंनी करताच वातावरण एकच भारावले. यावेळी रस्त्यावरील ये-जा करणाºयांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांच्या या स्तृत्य उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. खरे शिक्षण समाजातील वेदनेची माहिती देणारे असावे, असे भावपूर्ण उद्गार भिक्षेकरूंनी व्यक्त केले. याप्रसंगी मुख्याध्यापक एस.एन. लंजे, पर्यवेक्षक सुनिल नासरे, शरद भेलकर, शिक्षकवृंद पंकज बोरकर, चैनलाल परिहार, मोहन भोयर, शिक्षकेत्तर कर्मचारी, राजू कापगते, बिंझाडे, दीपक पडोळे, राहांगडालेसह शिक्षकवृंद उपस्थित होते.

Web Title: Blanket to beggars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.