धानाचा पुंजणा जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 10:00 PM2017-10-29T22:00:23+5:302017-10-29T22:00:51+5:30
अड्याळहून पाच कि़मी. अंतरावरील विरली खंदार येथील शेतकरी शरद रामकृष्ण जिभकाटे यांच्या मालकीच्या दीड एकरातील धानाचा पुंजणा शेतातच जळून खाक झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : अड्याळहून पाच कि़मी. अंतरावरील विरली खंदार येथील शेतकरी शरद रामकृष्ण जिभकाटे यांच्या मालकीच्या दीड एकरातील धानाचा पुंजणा शेतातच जळून खाक झाला. ही घटना २७ आॅक्टोबरला मध्यरात्रीच्या सुमारास घडली. आजुबाजुला कुठेही आग जाळल्याचे लक्षण नसताना ही आग लागली कशी, हा शोधाचा विषय ठरला आहे. धानाचे पुजंणे जाळणारा कोण असावा, अल्पभुधारक शेतकºयाचे नुकसान करण्यामागे कुणाचा काय हेतू होता, याचा शोध घेणे आवश्यक झाले आहे.
माहितीनुसार, एक महिन्याआधी तंटामुक्त समिती अध्यक्षा रजनी मोडघरे यांनी गावातील महिलांना एकत्रीत आणून त्यांच्या सहकार्याने गावात कधी बंद न होणारी दारूबंदी केली. त्यात गावात कुठेही किंवा गावाच्या सिमेवर जिथे जिथे दारू विक्रीची माहिती मिळत गेली तिथे तिथे दारूविके्रत्यांची दानादान केली. त्यात अनेकदा दारूही पोलिसांना पकडून देण्यात तंटामुक्त समिती अध्यक्षा यशस्वी झाल्या आणि गावात दारूबंदी केल्यामुळे गावातीलच दारू विक्री करणाºया एका इसमाने हा धानाचा पुंजणा जाळला असावा, असा संशय नावासहित घेण्यात आलेला आहे.
विरली खंदार गावात जेव्हा दारूबंदी मोहिम राबविण्यात आली होती तेव्हा गावात तीन दारूविक्रेते दारू अवैधपणे विकणारे होते. मग धानाचा पुंजना एकाच दारू विके्रत्याने जाळले असावे हे योग्य आहे का?
तंटामुक्त समिती अध्यक्षा व पती संतोष मोडघरे हे दोघेच दारूविक्री करणाºया ठिकाणी जावून जिवाची पर्वा न करता दारू पकडतात असे खुद अध्यक्षा सांगतात, मग आरोप, संशय एकाच दारूविक्रेत्यावरच का, असा सवाल आहे.
तिघांपैकीच एकाने जाळले की त्यात तिघांचाही समावेश असावा याचा शोध किंवा यापैकी एकाचाही या घटनेत हात नसावा याचा सुद्धा शोध लागणे गरजेचे राहिले. ज्या इसमांनी शेतशिवारातील धानाचा पुंजना जाळला म्हणून आम्ही यांचे घर जाळावे असाही प्रकार त्याच गावात त्याच दिवशीच्या रात्रीला घडला होता.