‘सोशल’ भक्तांची अंध मुशाफिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:33 PM2019-01-29T23:33:04+5:302019-01-29T23:33:35+5:30

काही वर्षापूर्वी चैनीची वस्तू असलेला मोबाईल आता जीवनावश्यक झाला आहे. आर्थिक व्यवहारापासून ते माहितीच्या आदानाप्रदानापर्यंत सर्वच मोबाईलवर होऊ लागले. मोबाईलच्या फायद्यासोबतच त्याच्या दुष्परिणामाचाही सामना करावा लागत आहे. सोशल मिडीयाचे तर अनेकांना जणू व्यसन लागले आहे. दररोज धडकणाऱ्या शेकडो संदेशाची खातरजमा न करता पुढे पाठवचा सपाटा सुरु आहे. सोशल भक्तांची ही अंध मुशाफिरी आता अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

Blind Mashafiri of 'Social' devotees | ‘सोशल’ भक्तांची अंध मुशाफिरी

‘सोशल’ भक्तांची अंध मुशाफिरी

Next
ठळक मुद्देपाठव पुढे : मॅसेजचा अहोरात्र धुमाकूळ

ज्ञानेश्वर मुंदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : काही वर्षापूर्वी चैनीची वस्तू असलेला मोबाईल आता जीवनावश्यक झाला आहे. आर्थिक व्यवहारापासून ते माहितीच्या आदानाप्रदानापर्यंत सर्वच मोबाईलवर होऊ लागले. मोबाईलच्या फायद्यासोबतच त्याच्या दुष्परिणामाचाही सामना करावा लागत आहे. सोशल मिडीयाचे तर अनेकांना जणू व्यसन लागले आहे. दररोज धडकणाऱ्या शेकडो संदेशाची खातरजमा न करता पुढे पाठवचा सपाटा सुरु आहे. सोशल भक्तांची ही अंध मुशाफिरी आता अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
‘आज रात्री कॉस्मीक किरणांचा मारा होणार, मोबाईल बंद ठेवा’, ‘महत्वाची कागदपत्रे सापडली संबंधितांपर्यंत पोहचविण्यासाठी शेअर करा’, ‘मुलगा-मुलगी हरविली, आईवडीलांचा शोध घेण्यास मदत करा’ यासारखे संदेश व्हॉटस्अ‍ॅपवर तर जयहिंद लिखकर शेअर करे, चोरी छिपे आपका प्रोफाईल कोन देखता है, पुनर्जन्म में आप कौन थे, महाभारत के कोनसा पात्र आप थे अशा पोस्ट फेसबुकवर धडाधड येऊन पडतात. या प्रकाराला नागरिक बळी पडत आहेत.
पूर्वी संवादाचे माध्यम असलेला मोबाईल आता गॅझेट्स झाला आहे. कोणतीही गोष्ट अवघ्या काही क्षणात मोबाईलवरून करणे शक्य झाले आहे. त्यातच अलिकडे विविध कंपन्यांचे अती स्वस्तातील डाटाचे पॅकेज त्याला हातभार लावत आहेत. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आणि त्याने प्रत्येकाला भुरळ पाडली. फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅप तर अनेकांचा श्वास झाला आहे. दर पाचदहा मिनिटांनी मोबाईलवर बोटे फिरवून आणि तासन्तास मोबाईलमध्ये मान खुपसून बसणारे दिसून येतात. जणू अनेकांना मोबाईलने आपल्या पाशात अडकविल्याचे दिसून येते.
दररोज शेकडो मॅसेज व्हॉटस्अ‍ॅपवर धडकतात. त्यावर येणारे मॅसेज फॉरवर्ड करण्याचा प्रत्येक जण आनंद घेतो. परंतु अनेकदा कोणतीही खातरजमा न करता मॅसेज पाठविला जातो. त्यातून अनेकदा सामाजिक समस्या, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडतात. अनेक ठिकाणी गुन्हेही दाखल झाले आहेत. परंतु त्यातून कुणी शिक्षित झाला नाही. अलिकडे तर भीती निर्माण करणारे मॅसेजही येत आहेत. एकाच ग्रुपवर दहादा तोच तो मॅसेज फिरत राहतो. मॅसेजची सत्यता कुणीही पडताळत नाही. आपल्याला माहित झाले, दुसऱ्यांनाही माहित व्हावे म्हणून हा मॅसेज थेट फॉरवर्ड केला जातो. अलिकडे पाच पेक्षा अधिक मॅसेज फॉरवर्ड होत नाहीत. परंतु तरीही अनेक जण असे मॅसेज पाठवतच असतात. सोशल भक्तांची ही अंध मुशाफिरी भविष्यात एखादे कोणते मोठे संकट उभे करेल हे सांगता येत नाही.
न वाचता मॅसेज करतात डिलीट
प्रत्येकाच्या व्हॉटस्अ‍ॅपमध्ये किमान १० ग्रुप तरी असतात. प्रत्येक ग्रुपवर दिवसाला २० मॅसेज आले तरी दिवसाकाठी २०० मॅसेज धडकतात. त्यासोबतच इमेजेसही असतात. एका दिवशी २०० मॅसेज वाचण्यासाठी कुणालाही वेळ नसतो. मग सर्व मॅसेज एका बटनाने डिलीट केले जातात.

Web Title: Blind Mashafiri of 'Social' devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.