विज्ञान महाविद्यालयात ३७ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:33 AM2020-12-29T04:33:36+5:302020-12-29T04:33:36+5:30
पवनी : श्री.शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित विज्ञान महाविद्यालय पवनी येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत स्व.डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब ...
पवनी : श्री.शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित विज्ञान महाविद्यालय पवनी येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत स्व.डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती निमित्त रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्व.डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे शिबिराचे उद्घाटन संस्थेचे सदस्य हेमंत काळमेघ यांनी केले. कोरोना परिस्थिती लक्षात घेता सामान्य रुग्णालय असो वा खासगी रुग्णालय जेव्हा-जेव्हा तातडीने एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज भासते तेव्हा-तेव्हा रूग्णाला मोठा त्रास सहन करावा लागतो.कधी-कधी वेळेवर गटाच्या रक्त उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना रक्ताच्या कमतरतेमुळे प्राणही गमवावे लागते.अशा परिस्थितीत माणुसकी जपण्याच्या हेतूने व जिल्ह्या बरोबरच देशात होत असलेल्या रक्ताच्या तुटवडा व रक्त साठ्याच्या अल्प पुरवठा लक्षात घेता रक्तदान शिबिराचे व मोफत आरोग्य तपासणी व नेत्र निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असे मनोगत प्राचार्य डॉ विजय लेपसे यांनी व्यक्त केले . रक्तदानासाठी युवक-युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ३७ रक्तदात्यांनी स्वेच्छा रक्तदान केले. आरोग्य तपासणी शिबिरात ५३ रुग्णांनी तर नेत्रनिदान शिबिरात २८ रूग्णांनी लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डाॅ.विठ्ठल पतंगे व सहकार्यक्रम अधिकारी डाॅ.रिनी जैन तसेच प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी व रा.से.यो चे सर्व स्वयंसेवकांनी व विविध सामाजिक संघटनांनी व समाजसेवकांनी सहकार्य केले. माजी नगराध्यक्ष मोहन सुरकर, लोकमंगल गृपचे अनिल मेंढे, राजेंद्र फुलबांधे, उद्धव कोरे, अशोक पारधी यांनी शिबिराला सदिच्छा भेट दिली.