मोखारा येथे ५३ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:38 AM2021-08-19T04:38:36+5:302021-08-19T04:38:36+5:30
राष्ट्रसंतांच्या शिकवणीतून मोखारा गावाने केलेला प्रवास तालुक्यात नावलौकिक मिळवून गेला. गावासाठी कार्य करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मानवतेच्या विचारांवर पाऊल ...
राष्ट्रसंतांच्या शिकवणीतून मोखारा गावाने केलेला प्रवास तालुक्यात नावलौकिक मिळवून गेला. गावासाठी कार्य करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मानवतेच्या विचारांवर पाऊल ठेवून गाव गणराज्याच्या संकल्पनेला रुजविण्याचे कार्य गावकरी करीत असल्याने आदर्श मोखारावासीयांसाठी अभिमान असून लोकचळवळीच्या कार्यात गावकऱ्यांनी सहकार्य देण्याचे आवाहन सरपंच प्रीती नखाते यांनी केले.
जितेंद्र नखाते यांच्या नेतृत्वात ग्रामवासी मोखारा(चौ.) द्वारा आयोजित भव्य रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सभामंडप मोखारा (चौ.) येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच प्रीती नखाते यांनी केले. प्रमुख उपस्थितींमध्ये उपसरपंच रामेश्वर नखाते, जितेंद्र नखाते, तंमुस अध्यक्ष मेघेशाम गिरेपुंजे, शाळा समिती सदस्य राजू काटेखाये, गिरीष नखाते, संपत नखाते, करुणा रामटेके, भाऊराव गिरेपुंजे, अस्मिता भुते, सोनाली काटेखाये, प्रणाली रामटेके, सरिता बीलवणे, राकेश बिलवणे, ग्रामसेवक के. जी. दोनोडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. रक्तदान शिबिरात ५३ तरुण रक्तदात्यांनी रक्तदान करून तालुक्यातील आजपर्यंतची आकडेमोड केली. यावेळी समर्पण ब्लड बँक भंडाराच्या चमूने रक्तदानाची प्रक्रिया पार पाडली. सर्वात जास्त व्यक्तींनी रक्तदान केल्याने आयोजक जितेंद्र नखाते व गावकऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी धर्मेंद्र नखाते, आदित्य काजरखाने, अभिषेक बिलवणे, योगेश पडोळे, अनिल नखाते, कुंदन कांबळे, आकाश मेश्राम, दिलखुश नखाते, समीर नखाते, राजेश मेंगरे, अनिल बावनकर, पीयूष गिर्हेपुंजे, वैभव मोहकर, भूषण भुरे, देवेंद्र गिर्हेपुंजे, संतोष मोहरकर, विरेश वैद्य, प्रदीप गिर्हेपुंजे, तुलसीदास मुंडले, सुशील पाऊल, रोशन मुरकुटे, रुपेश नखाते, अमित नखाते, रक्सित वानखेडे, विशाल मेणवाडे, विकास सावरबांधे, गौरव कोरे, राकेश नखाते, शिवदास नखाते, शेखर सावरबांधे, दीपक कुंभरे, भुमेश्वर काटेखाये, छोटू मेश्राम, सतीश नाक्षीने, विनायक रायपूरे, राहुल मेणवाडे, विश्वनाथ राऊत, हरिहर लकडस्वार, मंगेश नागरीकर, रुपेश दुर्गे, पराग काटेखाये, संजू ईखार, लीलाधर मेनवाडे, मुकेश भूते, हितेश मोहरकर, सतीश गिर्हेपुंजे, देविदास बिलवने, खुशाल मोहरकार, रोशन मानकर, चंद्रशेखर ईखार, रोशन ईखार, रितेश गिर्हेपुंजे, राकेश गिर्हेपुंजे यांनी रक्तदान केले.
बॉक्स
वृक्षारोपणासाठी आणून दिली झाडे
वृक्षारोपणासाठी जितेंद्र नखाते यांनी १०० झाडे, प्रमोद मेंढे यांनी २५ झाडे, सुनील नकाते यांनी ५ झाडे, शरद नखाते यांनी २ झाडे, शिक्षक नखाते, अनिल नखाते, सत्यपाल नखाते, भालचंद्र वासनिक, उमेश रामटेके, जागेश्वर पडोळे, मेघश्याम गिरेपुंजे, नितीन काटेखाये, शेखर सावरबांधे, सिद्धार्थ नखाते, विष्णू नखाते, सचिन गिर्हेपुंजे, गोवर्धन नखाते, राकेश गिर्हेपुंजे, माणिक बिलवणे यांनी प्रत्येकी २ याप्रमाणे झाडे आणून दिले. संचालन गिरीश नखाते यांनी तर आभार प्रदर्शन देविदास बिलवणे यांनी केले.