लाखांदूर येथे रक्तदान व नेत्रतपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:39 AM2021-09-06T04:39:11+5:302021-09-06T04:39:11+5:30
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी तालुकाध्यक्ष बालू चुन्ने, शहराध्यक्ष ॲड. मोहन राऊत, युवक अध्यक्ष राकेश राऊत, प्रमोद प्रधान, जिल्हा रोजगार समन्वयक रजनीकांत ...
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी तालुकाध्यक्ष बालू चुन्ने, शहराध्यक्ष ॲड. मोहन राऊत, युवक अध्यक्ष राकेश राऊत, प्रमोद प्रधान, जिल्हा रोजगार समन्वयक रजनीकांत खंडारे, महिला शहराध्यक्ष गीता लंजे, युवती अध्यक्ष सुनीता बिसेन, सुभाष दिवठे, शुद्धोधन टेंभुर्णे, बाळू रणदिवे, मंगेश ब्राह्मणकर, उमेश राऊत, हितेश झोडे, संतोष गोंधोळे, मिलिंद डोंगरे, जिक्रिया पठाण, संजय नहाले, वैभव खोब्रागडे, क्रिष्णा खोब्रागडे आदी उपस्थित होते.
यावेळी परिसरातील जवळपास १६ युवकांनी रक्तदान केले. रक्तदात्यांमध्ये हेमंत नाकतोडे, निकष राऊत, शेखर चौधरी, विजय राऊत, विलास बेदरे, यतीन राऊत, मूलचंद ठाकरे, सचिन वकरे, लोचन ठाकरे, खेवाराम लंजे, अमोल बिडवाईकर, वैभव खोब्रागडे, रमेश लांडगे, राकेश राऊत, ताहील शेख आदींचा समावेश होता. याप्रसंगी तालुक्यातील ३२ नागरिकांनी नेत्रतपासणीत सहभाग घेतला.
शिबिरासाठी भंडारा येथील समर्पण रक्तपेढीचे संचालक मुन्ना नखाते व नेत्रपेढीसाठी इंद्राक्षी आय केअर यांचे सहकार्य लाभले.
बॉक्स
तिरळेपणा रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया
रक्तदान व मोफत नेत्रतपासणी शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यात १६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर, ३२ नागरिकांनी नेत्रतपासणी केली. या नेत्रतपासणीअंतर्गत तिरळेपणा आढळणाऱ्या रुग्णांवर भंडारा येथील इंद्राणी आय केअर येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष बालू चुन्ने यांनी दिली.
050921\img-20210904-wa0028.jpg
नेञतपासणी करतांना तालुक्यातील युवक