‘लोकमत’ची रक्तदान चळवळ प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:25 AM2021-07-16T04:25:13+5:302021-07-16T04:25:13+5:30

स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त तुमसर येथील गभने सभागृहात आयोजित रक्तदान महायज्ञ शिबिरात ते ...

The blood donation movement of ‘Lokmat’ is inspiring | ‘लोकमत’ची रक्तदान चळवळ प्रेरणादायी

‘लोकमत’ची रक्तदान चळवळ प्रेरणादायी

googlenewsNext

स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त तुमसर येथील गभने सभागृहात आयोजित रक्तदान महायज्ञ शिबिरात ते बोलत होते. या शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान केले. सर्वप्रथम स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पांजली अर्पित केली.

प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, माजी खासदार शिशुपाल पटले, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार चरण वाघमारे, उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, तहसीलदार बाळासाहेब टेढे, पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार, पोलीस उपनिरीक्षक व्ही. व्ही. गोमलाडू, उडान संस्थेच्या संस्थापक कल्याणी भुरे, ‘लोकमत’चे जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर मुंदे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सचिन बाळबुधे, डॉ. मधुकर लांजे, बालरोग तज्ज्ञ डॉ. नितीन मिसुरकर, प्रदेश काँग्रेस सचिव प्रमोद तितीरमारे, नगरसेवक राजेश ठाकूर, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवचंद ठाकरे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकर राऊत, शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेश देशमुख, शिवसेना विधानसभा संघटक सुधाकर कारेमोरे, बाजार समिती संचालक बालकदास ठवकर उपस्थित होते. यावेळी माजी खासदार मधुकरराव कुकडे माजी खासदार शिशुपाल पटले व नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी मार्गदर्शन केले. रक्त संकलन जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. मीरा सोनवणे, सुरेखा भिवगडे, पूजा गुप्ता, राहुल गिरी, राजू नागदिवे, मनोज जाधव, पल्लवी अतकरी यांनी केले.

शिबिराला जनता विद्यालयाचे शिक्षक पंकज बोरकर, शिवसेना विभाग प्रमुख अमित मेश्राम, शिवसेना उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर,पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश बर्वे, तालुका प्रेस वेलफेअरचे अध्यक्ष लीलाधर वाडीभस्मे, निखिल कटारे, आदिवासी सेवक अशोक उईके, तोशल बुरडे, प्रफुल्ल वराडे, लायन्स क्लबचे अध्यक्ष मनोज उकरे, देवचंद टेंभरे, महेश गायधने, ज्ञानेश्वर ठवकर, रमेश लेदे, सुधीर गोमासे, रक्त वीर संघटनेचे मनोज राखडे, मीरा भट, जय डोंगरे, अर्पित जयस्वाल, प्रदीप भरणेकर, सुमित मलेवार, शिवप्रताप सिंग, प्रेरणा सिंगनजुडे, मयूर नखाते, अंकित नाकाडे, वल्लभ चौधरी, दिलीप भाऊ पारधी, प्रफुल वराडे, शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्यवाह पी.एम. नाकाडे, ‘लोकमत’चे वितरक संजू थोटे, विनोद भगत, गौरव हर्षे, माजी नगरसेविका कुंदा वैद्य, करुणा धुर्वे, रंजना ठाकरे, निमा रीनायते, पल्लवी रीनाय ते, सुजाता देशमुख, प्रतिमा नंदनवार, अर्चना डुंबरे, रोशनी माटे, नेहा मोटघरे,मीना टेटे, प्रभा सोनकुवर, संगीता राठोड यांच्यासह लोकमत सखी मंच सदस्य उपस्थित होते. शिबिरासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव प्रा. कमलाकर निखाडे सहकार्य लाभले. उडान संस्थेच्या संस्थापिका कल्याणी भुरे, लोकमत तालुका संयोजिका रितू पशिने, अनिल गभने यांचे विशेष सहकार्य मिळाले. लायन्स क्लब तुमसर, जेसीआय तुमसर यांनीही मदत केली. रक्तदात्यांना मास्क आणि सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक व संचालन लोकमत तालुका प्रतिनिधी मोहन भोयर तर आभार लोकमत सखी मंच संयोजिका रितू पशिने यांनी मानले.

बाॅक्स

यांनी केले रक्तदान

भाऊराव भगत, महेश बडवाईक, कोमल जीभकाटे, चंद्रशेखर भजने, विवेक गजभिये, मनोज ऊकरे, प्रकाश हारगुडे, शशिकांत पुडके, अभिषेक रहांगडाले, तुषार कारेमोरे, नीलेश बांडेबुचे, प्रमोद हरडे, ज्ञानेश्वर बिरणवारे, विजयसिंग गोमलाडू, अमेय चौधरी, अंकित नाकाडे, अनिकेत बडवाईक, पुंडलिक नाकाडे, चंद्रशेखर नेवारे, नितीन चव्हाण, संजय जाधव, हेमंत कुंभरे, संदीप बेसरे, नारायण हटवार, राजकुमार तुमसरे, शरद राखडे, अभय गहाणे, संस्कार पशिने, प्रा. कमलाकर निखाडे, निखिल भैसारे, अतुल बिसने, प्रफुल किटे, शंतनू भोयर यांनी रक्तदान केले.

Web Title: The blood donation movement of ‘Lokmat’ is inspiring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.