दारूच्या वादातून गळा चिरून तरूणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2017 12:18 AM2017-06-08T00:18:45+5:302017-06-08T00:18:45+5:30

दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या वादात पाच तरूणांनी मिळून एकाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला.

The blood of the youth slaughtered by the wine quarrel | दारूच्या वादातून गळा चिरून तरूणाचा खून

दारूच्या वादातून गळा चिरून तरूणाचा खून

Next

मोठा बाजार परिसरातील घटना : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रीच केली पाच आरोपींना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या वादात पाच तरूणांनी मिळून एकाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास भंडारा शहरातील मोठा बाजार परिसरातील हनुमान मंदिर गेटजवळ घडली. यातील पाचही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या तीन तासात अटक केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
हितेश मनोहरलाल ईसराणी (राजा सिंधी) (३५) रा.भंडारा असे मृत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी आसिफ शेरखाँ पठाण (३५), अन्वर ताराखाँ पठाण (३०), हमीद अहमद पठाण (२६), आकाश गेंदलाल सोनेकर (२३), रा. बाबा मस्तानशाह वॉर्ड, भंडारा, शाबीर खाँ ऊर्फ भुऱ्या जमीर पठाण (२६), रा.अन्सारी वॉर्ड भंडारा या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
शहरातील गजबजलेला परिसर म्हणून मोठा बाजार चौक ओळखला जातो. हनुमान मंदिर प्रवेशद्वाराजवळ राजा याचे पानठेला दुकान आहे. पोलिसांनी दिलल्या माहितीनुसार, या भागात काही ठिकाणी दारू विक्रीचा व्यवसाय होतो. आरोपी तरूणांना दारू पिण्याची सवय आहे. नेहमीप्रमाणे हे तरूण मंगळवारला दुपारी त्याठिकाणी गेले होते. यावेळी राजा आणि आरोपी यांच्यात दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर ते तरूण तिथून परतले. मात्र, त्यांनी राजा याला जीवे मारण्याचा कट रचला. मंगळवारला रात्रीच्या सुमारास हे सर्व आरोपी तरूण राजाच्या शोधात त्याच्या दुकानाकडे गेले. त्यावेळी राजाचा त्या तरूणांशी वाद झाल्याने या पाचही आरोपींनी त्याच्यावर हल्ला करून धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरला. यात भीषण हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर सर्व आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. ही माहिती भंडारा पोलिसांना मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. याची माहिती प्रभारी पालीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांना देण्यात आली. त्यांनी घटनेचे गांभिर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांना तपासाचे आदेश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाला भेट दिल्यानंतर आरोपींबाबत माहिती घेऊन परिसरात नाकाबंदी केली. त्यानंतर पाचही आरोपींना मोठ्या शिताफिने रात्रीच अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, सहायक पोलीस निरीक्षक एस. एच. रिजवी, विनोद रहांगडाले, पोलीस कर्मचारी अरूण झंझाड, नेपालचंद्र टिचकुले, राजेश गजभिये, सुधिर मडामे, वामन ठाकरे, धर्मेंद्र बोरकर, सावन जाधव, साकुरे, रेहपाडे, नंदनवार, चव्हाण, मंगलसिंग कुथे, रमेश चोपकर, रोशन गजभिये, क्रिष्णा बोरकर, दिनेश आंबेडारे, बबन अतकरी, गभणे, रमाकांत बोंद्रे, कौशिक गजभिये, वैभव चामट, स्रेहल गजभिये, चेतन पोटे, सुप्रिया मेश्राम, योगिता जांगळे, चालक रामटेके आदींनी केली.

आरोपीने मारल्या स्लॅबवरून उड्या
राजा इसरानी खून प्रकरणातील आरोपी अन्वर पठाण हा घटनेनंतर एका घराच्या स्लॅबवर लपून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्या शोधात असलेले पोलीस त्या घरी पोहोचल्याची माहिती त्याला होताच, त्याने स्लॅबरून खाली उडी मारली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. दरम्यान आरोपीने एका ठिकाणची सुमारे १२ ते १३ फुट उंच संरक्षण भिंतीवरून उडी मारून पोबारा करण्याचा प्रयत्न केला. त्या पाठोपाठ पोलिसांनीही स्वत:चा जीव धोक्यात घालून भिंतीवरून उड्या मारून पाठलाग केला आणि आरोपीला ताब्यात घेतले.

Web Title: The blood of the youth slaughtered by the wine quarrel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.