दिघोरीत जलयुक्त शिवार योजना ठरतेय वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 10:29 PM2018-10-25T22:29:10+5:302018-10-25T22:29:46+5:30

महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजना दिघोरीत उत्कृष्ठपणे राबविल्यामुळे ही योजना दिघोरीवासीयांसाठी वरदान ठरलेली आहे. जलयुक्त शिवार योजनेत दिघोरीमध्ये सात विहिरींना पुनर्भरणाची सोय करण्यात आली.

The boating plan for the water supply scheme is a boon | दिघोरीत जलयुक्त शिवार योजना ठरतेय वरदान

दिघोरीत जलयुक्त शिवार योजना ठरतेय वरदान

googlenewsNext
ठळक मुद्देविहीर पुनर्भरणामुळे पाण्याच्या पातळीत वाढ : बंधाऱ्यामुळे मिळतेय शेतीला पाणी

मुकेश देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दिघोरी (मोठी) : महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजना दिघोरीत उत्कृष्ठपणे राबविल्यामुळे ही योजना दिघोरीवासीयांसाठी वरदान ठरलेली आहे.
जलयुक्त शिवार योजनेत दिघोरीमध्ये सात विहिरींना पुनर्भरणाची सोय करण्यात आली. यामुळे विहिरीतील पाण्याच्या पातळीत ३५ टक्के वाढ दिसून आल्याने विहीर पुनर्भरण योजना कमालीची यशस्वी ठरली. त्यामुळे या शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचा पेरा नक्कीच वाढेल यात दुमत नाही.
तसेच याअगोदर बांधलेल्या सात बंधाऱ्यांची नव्याने दुरुस्ती करुन संपुर्ण लिकेज बंद करण्यात आला असल्याने पावसाचे पाणी थेट वाहून न जाता बंधाऱ्यात साचून राहिले. त्यामुळे बंधाऱ्यालगतच्या सर्व शेतकºयांना पावसाने दडी मारल्यावर सुध्दा पीक वाचविणे शक्य झाले.
आजघडीला बंधाऱ्यात अजूनही भरपूर पाणी असल्याने कडधान्य पिके घेणे शेतकऱ्यांना फायद्याचे ठरेल यावरुन असे लक्षात येते की, शेतकऱ्यांना बंधाऱ्यातील पाण्याच्या उपलब्धतेमुळे दोनदा पिक घेणे शक्य होईल.
यासोबतच दिघोरीत जलयुक्त शिवार योजनेतून सात वनतलाव, तीन साठवण तलाव, लोकसहभागातून सात तलावातील गाळ काढण्यात आली, तसेच तीन तलावांचे खोलीकरण करण्यात आणि एक नवीन बंधारा तयार करण्यात आल्याने दिघोरीच्या सभोवताल पाणी साठविण्याचे जाळे तयार झाले. यावर्षी पोळ्यापासून पावसाने दडी मारली असली तरी दिघोरीत पाण्याची अडचण निर्माण न होता. तलाव व बंधाºयामार्फत शेतीला मुबलक पाणी देण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक दर्जा उंचावण्यास खूप मोठी मदत झाली.
यावर्षी अत्यल्प पाऊस पडला असला तरी दिघोरीत जलयुक्त शिवार योजनेतून दिघोरीत झालेल्या कामामुळे जमिनीतील भूजल पातळी विशेष घट झाली नसल्याचे विहिरीतील पाण्याच्या स्त्रोतावरुन कळून येते. म्हणून दिघोरीसाठी जलयुक्त शिवार योजना वरदान ठरली असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
शासनाची जलयुक्त शिवार सर्वेक्षणाची टिम दिघोरीत दाखल झाली व त्यांनी बंधारे, विहिर पुनर्भरण योजना आदींचा आढावा घेतला असता जलयुक्त शिवार योजना दिघोरीत यशस्वीपणे राबविले असल्याचे अधिकारी मिलिंद शेंडे यांनी लोकमत प्रतिनिधीजवळ सांगितले. यावेळी भूवैज्ञानिक अजय सांपत, जिल्हा समन्वयक एन. टी. अतकरी, सरपंच अरुण गभणे, उपसरपंच रोहीदास देशमुख, तालुका कृषी अधिकारी निलेश गेडाम कृषी विस्तार अधिकारी प्रमोद वानखेडे व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते

Web Title: The boating plan for the water supply scheme is a boon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.