बोधिचेतिय विहारात धम्ममेघा धम्मसंमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 10:52 PM2019-01-23T22:52:32+5:302019-01-23T22:52:47+5:30
बोधिचेतिय संस्थान चिखली हमेशा, राजेगाव एमआयडीसी, डॉ. भदंत आनंद कौसल्यायन परिसर, खुटसावरी मार्ग या पर्यावरण स्थळी रविवारला धम्ममेघा धम्मसंमेलन उत्साहात पार पडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : बोधिचेतिय संस्थान चिखली हमेशा, राजेगाव एमआयडीसी, डॉ. भदंत आनंद कौसल्यायन परिसर, खुटसावरी मार्ग या पर्यावरण स्थळी रविवारला धम्ममेघा धम्मसंमेलन उत्साहात पार पडले.
भिक्षु संघ केळझरचे संघानुशासक भदंत सदानंद महास्थविर, यांच्या अध्यक्षतेत पत्र्त्रामेत्ता संघाचे अध्यक्ष भदंत संघरत्न मानके, बौद्ध प्रशिक्षण संस्थान, बुद्धभूमि नागपूरचे अध्यक्ष भदंत सत्यशील महाथेरो, भदंत संघकीर्ती थेरो, भिक्षु बोधानन्दसह सचिव, बौध्द प्रशिक्षण संस्थान, बुद्धभूमि, नागपूर, भिक्षु जीवक, भिक्षु धम्म शिखर, बालाघाट, भिक्षुणी धम्मदिना व त्यांचा भिक्षुणी संघ यांच्या प्रमुख उपस्थितीत तद्धवतच प्रा. वासंती सरदार, जी.एस. कांबळे औरंगाबाद यांच्या सानिध्यात, डॉ. भदंत धम्मदिप महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली खुटसावरी फाट्यापासून धम्मरॅली बँडच्या आवाजात जयभीम गर्जनेत बोधिचेतिय विहारात आली.
सर्वांच्या उपस्थितीत धम्मगर्जनेने रामजी सुभेदारांच्या व भीमाई आईच्या पुर्णाकृती पुतळ्याचे विधिवत उद्घाटन झाले. समता सैनिक दलाचे विदर्भ जीओसी गजेंद्र गजभिये आणि त्यांचे सहयोगी कविराज, राजू वाहने यांनी कमान सांभाळली. एकनाथ रामटेके, केशव रामटेके यांनी त्यांना विशेष सहकार्य केले.
प्रथम दर्शनी समता सैनिक भीम गायन मंडळ कोसमतोंडीच्या शालेय मुलींनी स्वागतम सुस्वागत हे अतिथी, तुम्हे हमारा प्रणाम, बाबासाहेबांच्या जीवन प्रवाहात ज्योतिबा - सावित्री फुले, शाहू राजे, रमाबाई आंबेडकरांची प्रेरणा मिळाली त्या स्वागत गीतात हाच भाग जागृत होता. अंगुलिमाल फिल्म हे मानव तु मुखसे बोल, बुद्धमं् शरण्ं गच्छामी व भिमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना या दोन रेकॉर्डिंग नृत्यांनी मृणाली खोब्रागडे धारगाव हिने श्रोतावर्गांना भारावून सोडले.
डॉ. भदंत आनंद कौसल्यायन यांच्या ११४ व्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. भदंत आनंद कौसल्यायन बहुमुखी प्रतिभाचे धनी हिंदी व पाली साहित्याचे प्रकांड पंडित म्हणून त्यांच्या पांडित्याची प्रशंसा केली.
मुख्य पाहुण्यांनी बाबासाहेबांच्या यशोगाथेची, बुद्धांच्या वाणीची भरभरून प्रशंसा केली. सरगम ग्रुप भंडारा यांनी बुद्ध-भीम गीतांनी सर्वांचे मन मोहून घेतले.
या कार्यक्रमासाठी सुषमा वासनिक, चांगुना कांबळे, अर्चना खोब्रागडे, रत्नमाला वासनिक, सुनंदा वासनिक, रचना वैद्य, शीला साखरे, द्वारका काणेकर, यशोधरा खोब्रागडे, हर्षा टेंभूर्णे, मीना कांबळे, शुक्रतारा गजभिये, लता उके, ज्योती मेश्राम, कुंदा बारसागडे, रेशमा बोरकर, फूलन गोंडाणे, प्रगती मगर, रेशमा रामटेके, पुस्तकला नंदागवळी, वैजंता लांजेवार या धम्मसेविकांनी आपली अहं भूमिका बजावली तर निवांत वासनिक, भारत नंदागवळी, केशव वालद्रे, सुजीत बडवाईक, अरविंद वासनिक, अनिल वासनिक, राजेश शहारे मिस्त्री, अजय शामकुवर, अमरदीप बोरकर, बळीराम राघोर्ते, ब्रिजलाल ठवरे, विनोद बोरकर, धमेंद्र बडोले, धनंजय रामटेके, रामकृष्ण कांबळे, डॉ. नरेश साखरे, ईश्वर बन्सोड, बी.एस. नंदा, अचल मेश्राम, मोरेश्वर बोरकर, मोहन शहारे, अनमोल कांबळे, देवानंद नंदेश्वर, मेश्राम, मारोती करवाडे, बाळा गिºहेपुंजे, मनोज वासनिक, रूस्तम बोरकर यांनी सहकार्य केले.