‘तो’ मृतदेह बेपत्ता विद्यार्थीनीचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 06:00 AM2020-01-24T06:00:00+5:302020-01-24T06:00:59+5:30

साकोली येथील नर्सरीत बुधवारी सकाळी कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला होता. या मृतदेहाजवळ स्कूल बॅग आढळली. त्यात शाळेचा गणवेश, पुस्तके व पावडरची पुडी आढळली होती. तसेच मृतदेहाजवळ चप्पल आणि हातात घड्याळ होती. मात्र सदर मृतदेह नेमका कुणाचा याचा बोध होत नव्हता. दरम्यान साकोली येथून ४० दिवसापुर्वी बेपत्ता झालेल्या दहाव्या वर्गातील विद्यार्थीनीचाच हा मृतदेह असावा, असा कयास पोलिसांचाच होता.

The 'body' belongs to the missing student | ‘तो’ मृतदेह बेपत्ता विद्यार्थीनीचाच

‘तो’ मृतदेह बेपत्ता विद्यार्थीनीचाच

Next
ठळक मुद्देसाकोलीचे प्रकरण : ओळख पटली, आत्महत्या की हत्या, प्रश्न कायमच

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : कुजलेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह ४० दिवसांपुर्वी बेपत्ता झालेल्या साकोली येथील विद्यार्थीनीचाच असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे संभ्रमात सापडलेल्या पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र सदर विद्यार्थीनीची आत्महत्या की खून हा प्रश्न मात्र गुलदस्त्यात आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण पुढे येण्याची शक्यता आहे.
साकोली येथील नर्सरीत बुधवारी सकाळी कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला होता. या मृतदेहाजवळ स्कूल बॅग आढळली. त्यात शाळेचा गणवेश, पुस्तके व पावडरची पुडी आढळली होती. तसेच मृतदेहाजवळ चप्पल आणि हातात घड्याळ होती. मात्र सदर मृतदेह नेमका कुणाचा याचा बोध होत नव्हता. दरम्यान साकोली येथून ४० दिवसापुर्वी बेपत्ता झालेल्या दहाव्या वर्गातील विद्यार्थीनीचाच हा मृतदेह असावा, असा कयास पोलिसांचाच होता. परंतु पालकांनी सदर मृतदेह आपल्या मुलीचा नाही, अशी भूमीका घेतली होती. परंतु मृतदेहाजवळ आढळलेले सर्व साहित्य आपल्या मुलीचे आहे, असे सांगत होते. त्यामुहे हा मृतदेह नेमका कुणाचा, असा संभ्रम निर्माण झाला होता.
दरम्यान उशिरा रात्री सदर मुलीच्या पालकांनी मृतदेहाच्या आंगावरील कपडे, बॅग, पुस्तके, बॅगमधील कपडे व इतर साहित्यावरून मृतदेह माझ्या मुलीचाच असल्याची ओळख दिली. त्यामुळे दिवसभर निर्माण झालेला संभ्रम संपुष्टात आला. मात्र तिचा खून झाला की आत्महत्या हा प्रश्न मात्र अद्यापही कायम आहे. पोलीस पथके त्यादृष्टीने शोध घेत आहेत. सदर विद्यार्थीनी १४ डिसेंबर २०१९ रोजी बेपत्ता झाली होती.
पोलिसांच्या तपासात सदर मुलगी शाळेत न जाता नागझिरा रोडवरील मैत्रीनीच्या घरी गेली. तिथे तिने शाळेचा गणवेश बदलवून दुसरे कपडे परिधान केले. त्यानंतर ती सायकलीने तेथून निघून गेली, असे पुढे आले होते. दरम्यान तिचा शोध सुरू असताना नर्सरीत मृतदेह आढळला. सदर मृतदेह बेपत्ता विद्यार्थीनीचाच असल्याचा दावा सुरूवातीपासून पोलीस करीत होते. अखेर पोलिसांचा हा दावा खरा ठरला. आता पोलिसांपुढे सदर विद्यार्थीनीच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्याचे आवाहन उभे ठाकले आहे.

मृतदेह घेऊन नातेवाईक धडकले साकोली ठाण्यावर
विद्यार्थीनीच्या मृत्यू प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करा, तपास सीबीआयकडे द्या आणि चौकशी असलेल्या जमादाराचे तात्काळ निलंबन करा, अशी मागणी करीत सदर विद्यार्थीनीचे नातेवाईक रात्री ८ वाजता मृतदेहासह साकोली पोलीस ठाण्यावर धडकले. नागपूर येथे उत्तरीय तपासणी झाल्यानंतर नातेवाईक पोलीस ठाण्यावर पोहचले. याठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी तुकाराम काटे यांना निवेदन देण्यात आले.

मृतदेह घेवून आलेली शववाहिनी
त्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. याप्रकरणी न्याय मिळाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मृत्यूचे कारण गुलदस्त्यात
सदर विद्यार्थीनी घरून शाळेत जाण्यासाठी निघाली होती. मात्र ती शाळेत पोहचली नाही. अचानक बेपत्ता झाली. शोध घेतल्यानंतरही थांगपत्ता लागत नव्हता. परंतु अचानक कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह नर्सरीत आढळला. त्यामुळे तिची हत्या आहे की आत्महत्या हा प्रश्न कायमच आहे. तिच्या मृत्यूच्या कारणांचा शोध पोलीस घेत आहेत.
 

Web Title: The 'body' belongs to the missing student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.