खोकरला येथे देहव्यापार अड्डयावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 11:03 PM2018-05-11T23:03:30+5:302018-05-11T23:03:30+5:30
शहरालगत असलेल्या खोकरला येथील देहव्यापार अड्डयावर पोलीसांनी घातलेल्या धाडीत देहविक्री करण्याचे उद्देशाने चार महिला व एक इसम आढळून आला. ही कारवाई गुरुवारी सायंकाळच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: शहरालगत असलेल्या खोकरला येथील देहव्यापार अड्डयावर पोलीसांनी घातलेल्या धाडीत देहविक्री करण्याचे उद्देशाने चार महिला व एक इसम आढळून आला. ही कारवाई गुरुवारी सायंकाळच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
पोलीस अधीक्षक विनीता साहू यांना भंडारा शहरालगत असलेल्या खोकरला शिवारात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपणीय माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी हा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांना सांगून कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खोकरला शिवारात सुरू असलेल्या देहव्यापाराचे ठिकाणी शिताफीने सापळा रचून धाड घातली. दरम्यान, भाड्याच्या घरात राहणारी ४२ वर्षीय महिला घरी स्वत:चे मुलींना देहविक्री करण्यासाठी प्रवृत्त करताना आढळून आली. या ठिकाणी चार महिला व एक इसम आढळून आला. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी चार महिला व एका इसमाविरुध्द भादंवि ३, ४, ५ (क) अनैतीक व्यापार प्रतिबंधक कायदा सन १९५६ अन्वये गुन्हा नोंदविला. देहविक्री करण्याचे उद्देशाने मिळून आलेल्या त्या चार महिलांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक पोलीस निरिक्षक सुरेशकुमार घुसर, सहायक पोलीस निरिक्षक विजय पोटे, हवालदार वामन ठाकरे, सुधिर मडामे, पोलीस नायक रोशन गजभिये, शिपाई वैभव चामट, चेतन पोटे स्नेहल गजभिये, महिला शिपाई योगीता जांगळे, चालक हवालदार रामटेके यांनी केली.