नाल्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेहच आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:40 AM2021-08-21T04:40:38+5:302021-08-21T04:40:38+5:30
भारत धनराज परतेती (३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. ताे बुधवारी सायंकाळी शेतातून घरी परत येत हाेता. गावाजवळचा नाला ...
भारत धनराज परतेती (३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. ताे बुधवारी सायंकाळी शेतातून घरी परत येत हाेता. गावाजवळचा नाला पार करीत असताना सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अचानक नाल्याला लाेंढा आला. त्यात ताे वाहून गेला. रात्रभर त्याचा शाेध घेण्यात आला; परंतु थांगपत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि तालुका प्रशासनाच्या वतीने शाेधमाेहीम राबविण्यात आली. बाेट, जेसीबी आणि ट्रॅक्टरचीही मदत घेण्यात आली. परंतु गुरुवारी थांगपत्ता लागला नाही. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास नाल्यातच जलपर्णी वनस्पतीत त्याचा मृतदेह आढळून आला.
भारतच्या मागे पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. तीनही चिमुकल्या मुलींवर माेठे संकट काेसळले आहे. घरातील कमावती व्यक्ती हिरावल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त हाेत आहे. त्याला प्रशासनाने तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी सरपंच रशीद शेख यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे. घटनास्थळी तहसीलदार बाळासाहेब तेढे, मंडळ अधिकारी रिनायते, चाैरे, तलाठी दुबे, अंबुले, जयसिंग रावते व गावकरी उपस्थित हाेते.
200821\img-20210819-wa0042.jpg
मृत भारत परतेती ची फोटो