सोशल साईटवर बोगस नोकऱ्यांचे पेव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:28 PM2019-05-21T23:28:04+5:302019-05-21T23:30:04+5:30

सोशल नेटवर्किंग साईटवर सध्या सरकारी नोकरीच्या नावाने अनेक पेजेस दिसायला लागले आहेत. देशभरातील विविध सरकारी खात्यांत उच्चस्तरीय पदांची भरती सुरु असल्याचे हे पेजेस सांगतात.

Bogas jobs at social site! | सोशल साईटवर बोगस नोकऱ्यांचे पेव!

सोशल साईटवर बोगस नोकऱ्यांचे पेव!

Next
ठळक मुद्देबेरोजगार यंगस्टर भामट्यांच्या रडारवर : लाईक करण्यासाठी तरुणांची स्पर्धा, आधी खात्री करुन पाऊल उचलणे गरजेचे

भंडारा : सोशल नेटवर्किंग साईटवर सध्या सरकारी नोकरीच्या नावाने अनेक पेजेस दिसायला लागले आहेत. देशभरातील विविध सरकारी खात्यांत उच्चस्तरीय पदांची भरती सुरु असल्याचे हे पेजेस सांगतात. नोकरीच्या शोधात असणारे यंगस्टर दररोज लाखोंच्या संख्येने या पेसेजला भेट देत असतात, परंतु ही पदे खरोखरच भरली जाणार आहेत काय, याची आधी खात्री करणे गरजेचे आहे. कारण, आपल्या विभागात अशी भरतीत सुरु नसल्याचा दावा काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे. नोकºयांच्या नावाखाली यंगस्टरची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होताना दिसत आहे. तरुणांनी त्यापासून सावध राहण्याचा सल्ला या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.
रेल्वे आणि पोलीस खात्याचे आमिष
ज्या नोकºयांची जाहिरात फेसबुकवर येते त्यामध्ये सर्वाधिक जाहिराती शासकीय नोकऱ्यांशी संबंधित असतात. त्यातही रेल्वे आणि पोलीस या खात्यांमधील नोकऱ्यांच्या जाहिरातीच मोठ्या प्रमाणात येतात. लाखो बेरोजगारांचे फेसबुक म्हणजे हक्काच्या टाईमपासचे ठिकाण असल्याने ते हमखास या जाळ््यात अडकतात. त्यासाठी अर्ज केल्यानंतर फसवणूक झाल्याचे कळते तेव्हा त्यांची अवस्था बिकट झालेली असते.
तालुकानिहाय
पेजेसचीही भर
काहींनी तालुकानिहाय फेसबुकचे पेज तयार केले असून त्यावर या नोकऱ्यांची माहिती दिली जाते. त्यानुसार अर्ज करून अथवा प्रत्यक्ष नोकºया असलेल्या जागेवर जाऊन संधी घेण्यासाठी बेरोजगारांमध्ये स्पर्धाच लागते, परंतु त्यातही अनेक वेळा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गावी परतण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा मार्ग नसतो. कारण या प्रकारची तक्रारही करता येत नसल्याने ‘आळी मिळी गुप चिळी’ असाच हा प्रकार असल्याने तक्रार कुणाविषयी करावी, असा प्रश्न पडतो.
लिंकच्या जाळ््यात अडकतात बेरोजगार
अनेकदा फेसबुक ओपन केल्यानंतर अथवा कोणतीही सोशल साईट ओपन केल्यानंतर प्रत्येक यूजरला काही लिंक शेअर झालेल्या असतात. या लिंकचा उपयोग काय, हे माहिती नसताना केवळ लिंकवर क्लीक केल्यानंतर घरबसल्या हजारो कमवा अशी जाहिरात त्यात दिसून येते. जाहिरातीत काही व्यक्तीच्या मुलाखतीही असतात. त्याला बेरोजगार फसतात. या लिंकमुळेच फसवणूक होण्याच्या शक्यता वाढतात.
हे तर फेकबुकच !
घरी बसून हजारो कमवा, आॅनलाईन काम करा आणि हजारो कमवा यासारख्या असंख्य जाहिराती दररोज फेसबुकवर दिसत असतात. त्यासाठी काही वेळा दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता आधी या क्रमांकावर तुमची अनामत रक्कम भरा, असा संदेश दिला जातो. ती रक्कम भरल्यानंतरही अनेक वेळा संपर्क साधून त्वरित रोजगार दिला जात नाही. त्यानंतरही काही यंत्रणा खरेदी करा, त्यासाठी कच्चा माल खरेदी करा. उत्पादन झालेल्या मालाची मार्केटिंग करा. यासारख्या आणखी अडचणी समोर उभ्या राहतात. त्यामुळे फेसबुकवर येणाºया जाहिरातीतून फसवणूक झालेल्या अनेक युवकांना फेसबुक हे फेकबुकच वाटते. देशात बेरोजगारीचा प्रश्न केवढा गंभीर आहे, यावा अंदाज फेसबुकवरील एका पेजवरून दिसून येतो. सरकारी नोकºयांच्या नावाखाली बनविलेल्या या पेजला ‘लाईक’ करण्याºयांची संख्या आता चाळीस लाखावर पोहोचली आहे, अशाच प्रकारे बेरोजगारांना गडा घालणाºया भामट्यांनी फेसबुकवर नोकºयांचा बाजारच भरवला आहे.
पेजेस तयार करते कोण?
सरकारी नोकर भरतीचे हे पेजेस कुणी तयार केले आहेत. तसेच ते कुठून चालविले जातात. याबाबत काही सांगता येत नसले तरी हे खरोखरचे पेज आहे, असे भासविण्यासाठी एक लिंक मात्र जरूर दिली जाते. या ‘लिंक’ वर क्लिक करताच दुसरे पेज उघडले जाते. या पेजवर पदाची संख्या, अर्जदाराची पात्रता याबाबत माहिती दिलेली असते. ही दोन्ही पेजेस खरी आहेत काय, याची मात्र शाश्वती नाही, त्यामुळे अशा पेजेसवरून अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण खात्री करून घेणे गरजेचे आहे.
खासगी नोकऱ्यांचेही गाजर
फेसबुक नोकऱ्यांचे हे पेजेस खरे आहेत का खोटे, हे लगेच समजू शकत नाही. परंतु बेरोजगाराची फौज मात्र या पेजेसला लाखोच्या संख्येने लाईक आणि फॉलो करीत असतात. पेजेसचे नाव सरकारी नोकरी असे असून कंसात इंडियन गव्हर्नमेंट जॉब इन सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट असे इंग्रजीत लिहिले असते. सोशल पेजेसवर केवळ सरकारीच नव्हे, तर खासगी क्षेत्रातील नोकºयाचीही माहिती दिली जाते.

Web Title: Bogas jobs at social site!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.