वनरक्षकावर दोघांनी केला प्राणघातक हल्ला
By admin | Published: June 10, 2017 12:18 AM2017-06-10T00:18:53+5:302017-06-10T00:18:53+5:30
संरक्षित वनजमिनीवर अतिक्रमणाच्या वादातून दोन भावांनी वनपरिक्षेत्र कार्यालयात घुसून एका वनरक्षकावर प्राणघातक हल्ला केला.
गोबरवाही पोलिसात तक्रार : नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र कार्यालयातील प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : संरक्षित वनजमिनीवर अतिक्रमणाच्या वादातून दोन भावांनी वनपरिक्षेत्र कार्यालयात घुसून एका वनरक्षकावर प्राणघातक हल्ला केला. यात वनरक्षक गंभीर जखमी झाला. याप्रकरणी आरोपींना पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला. वनरक्षकाने आरोपींच्या वहिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी वनरक्षकावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरूवारी दुपारी ४ च्या सुमारास नाकाडोंगरी येथे घडली.
नाकाडोंगरी वनपरिक्षेत्राअंतर्गत गट क्रमांक १० ते गट क्रमांक १२ दरम्यान दिलीप अनंतराम घडले, गोल्टी अनंतराम घडले यांनी विटाभट्टी सुरू केली आहे. ही जमीन वनविभागाची असल्याचे सांगण्यात येते. गटक्रमांक १० व गटक्रमांक १२ चे टीएलआर करा अशा सूचना घडले बंधूना देण्यात आल्या होत्या. गटक्रमांक हा वनविभागाचा संरक्षित क्षेत्र आहे. ६,७,८ तारखेला वनविभागाने चार कोटी वृक्ष लागवड उपक्रमांअंतर्गत खड्डे खोदले होते.
वनरक्षक वैभवा उगले यांनी वनविभागातील चौकीदार रामा गौपाले, वनरक्षक सतीष बुरडे तथा बीटरक्षक ए.एन. बेडके यांना मौका स्थळावर पाठविले. तिथे खड्डे बुजविलेले आढळले. वनपरिक्षेत्र कार्यालयात परत येवून तिघांनी ही माहिती दिली. कार्यालयात वनपरिक्षेत्राधिकारी एम.एन. माकडे, वनरक्षक वैभव उगले बसले होते. कार्यालयात दिलीप घडले व त्याचा भाऊ गोल्टी घडले यांनी प्रवेश केला. वैभव उगले कुठे आहे अशी विचारणा त्यांनी कर्मचाऱ्यांना केली. दिलीप व गोल्टी घडले यांनी वैभव उगलेला धक्काबुक्की केली. दरम्यान गोल्टीने लोखंडी सामानाने डोळ्यावर व इतरत्र मारहान केली. वैभव उगले रक्तबंबाळ झाले. मारहाण प्रकरणी वनरक्षक वैभव उगले यांनी राज्याच्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना केले आहे. रक्ताच्या थारोळ्यात वनरक्षक यांना गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता नेले. दिलीप घडले व त्याचा भाऊ गोल्टी घडले यांना गोबरवाही पोलिसांनी अटक केली.
दरम्यान वनरक्षक वैभव उगले यांनी दिलीप व गोल्टी घडले. यांच्या वहिनीचा विनयभंग केल्याची तक्रार गोबरवाही पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी वैभव उगले यांच्यावर भांदवी ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास हवालदार तांडेकर तथा सहायक फौजदार मेश्राम करीत आहेत.
दिलीप व त्याचा भाऊ गोल्टी घडले यांनी वनरक्षक वैभव उगले यांना केलेली मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर वनरक्षक वैभव उगले यांनी आरोपींच्या वहिनीचा विनयभंग प्रकरणी वनरक्षक वैभव उगले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
-किशोर झोटींग,
सहा. पोलीस निरीक्षक गोबरवाही.