आधारकार्डच्या वादात भावाच्या डाेक्यावर फाेडली दारूची बाटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 05:01 PM2021-09-27T17:01:15+5:302021-09-27T17:22:20+5:30
रेशन कार्ड वेगळे करण्यासाठी दिलेले आधारकार्ड देण्यास नकार दिल्यावरून झालेल्या वादात मोठ्या भावाने लहान भावाच्या डाेक्यावर दारूची बाटली फाेडून गंभीर जखमी केले. याप्रकरणी याप्रकरणी दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भंडारा : रेशन कार्ड वेगळे बनवण्यासाठी मोठ्या भावाने लहान भावाला आधार कार्ड मागितले मात्र, परत केले नाही. यातून उत्पन्न झालेल्या वादात मोठ्या भावाने लहान भावाच्या डाेक्यावर दारूची बाटली फाेडून गंभीर जखमी करण्याची घटना पवनी तालुक्यातील भुयार येथे घडली. याप्रकरणी दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुदेव केवळराम झाेडे (३१), रा. भुयार असे जखमीचे नाव आहे. दुर्याेधन केवळराम झाेडे (३४) आणि साेमेश हरी झाेडे (२०) अशी आराेपींची नावे आहेत.
महिनाभरापूर्वी गुरुदेवने रेशनकार्ड वेगळे करण्यासाठी आधारकार्ड माेठा भाऊ दुर्याेधनला दिले हाेते. त्यावरून रेशन कार्ड वेगळेही करण्यात आले. त्यानंतर गुरुदेवने आपले आधारकार्ड माेठ्या भावाला मागितले. मात्र, ते परत न देता त्यावरून आराेपी दुर्याेधन याने आधारकार्ड देत नाही, तुझ्याने जे हाेते ते करून टाक असे म्हटले. त्यावरून त्या दाेन भावांत वाद सुरू झाला.
दरम्यान, तेथे चुलतभाऊ साेमेश्वरही आला व या दाेघांनी मिळून गुरुदेवला मारहाण केली. या भांडणात दुर्याेधनने त्याच्याजवळ असलेली दारूची काचेची बाटल गुरुदेवच्या डाेक्यावर मारली. त्यात ताे गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी दुर्याेधन व साेमेश विरुद्ध पवनी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.