वायुदलाच्या शौर्याला भंडारेकरांचा सॅल्युट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 10:37 PM2019-02-26T22:37:08+5:302019-02-26T22:39:44+5:30

पुलवामा हल्ल्याच्या बरोबर तेराव्या दिवशी भारतीय वायु सेनेने घरात शिरून आतंकवाद्यांचा खात्मा केला. वारंवार हल्ला करणाऱ्यांना भारतीय सेनेने चांगला धडा शिकविला. या हल्ल्याने शहीदांच्या आत्म्याला शांती मिळेल. हा तर ट्रेलर आहे, पिक्चर आणखी बाकी आहे,

Boundaries of valor | वायुदलाच्या शौर्याला भंडारेकरांचा सॅल्युट

वायुदलाच्या शौर्याला भंडारेकरांचा सॅल्युट

Next
ठळक मुद्देठिकठिकाणी जल्लोष : हा तर ट्रेलर आहे, पिक्चर आणखी बाकी आहे, नेहमी हल्ले करणाऱ्यांना चांगला धडा शिकविला

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पुलवामा हल्ल्याच्या बरोबर तेराव्या दिवशी भारतीय वायु सेनेने घरात शिरून आतंकवाद्यांचा खात्मा केला. वारंवार हल्ला करणाऱ्यांना भारतीय सेनेने चांगला धडा शिकविला. या हल्ल्याने शहीदांच्या आत्म्याला शांती मिळेल. हा तर ट्रेलर आहे, पिक्चर आणखी बाकी आहे, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया भारतीय वायूसेनेने पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या हल्ल्यानंतर भंडारा येथील नागरिक देत होते. भारतीय वायूसेनेच्या शौर्याला सलाम करण्यासाठी ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला. अनेक ठिकाणी फटाके फोडून आणि हातात तिरंगा घेवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
भारतीय वासूसेनेने मंगळवारी पहाटे प्रत्येक्ष नियंत्रणरेशा ओलांडून पाकव्याप्त काश्मिरातील आतंकवाद्यांचे तळ उध्वस्त केले. दूरचित्र वाहिण्यांवरून सकाळीच ही सु वार्ता ऐकायला येताच प्रत्येकाच्या चेहºयावर आनंद आणि उरात भारतीय सेनेबद्दलचा अभिमान दाटून आला. दिवसभर सर्वत्र याच हल्ल्याची चर्चा आणि भारतीय सैन्याचे अभिनंदन केले जात होते.
भारतीय सैन्यातील सेवानिवृत्त सुभेदार अ‍ॅड. दिवाण निर्वाण म्हणाले, भारतीय वासूसेनेने केलेली कारवाई भारतीयांसाठी गौरवाची बाब आहे. पाकिस्तानला धडा शिकवणे अत्यंत गरजेचे असून आतंकवाद्यांचा पूर्णपणे नायनाट करण्याची हीच खरी वेळ आहे. भारतीय सशस्त्रसेना कुठल्याही आवाहनाला तोंड देण्यास सक्षम असून १३५ कोटी नागरिकांच्या संवेदना व बळ त्यांच्या पाठिशी असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय सैन्यातील सेवानिवृत्त मेजर डॉ. श्रीकांत गिºहेपुंजे म्हणाले, पुलवामा हल्ला हा भारतीयांच्या काळजावर हल्ला होता. भारत हा शांतताप्रिय देश असताना या भेकड हल्ल्याने संपूर्ण देश खवळला. आतंकवाद्यांचा खात्मा केल्याशिवाय सैन्याने गप्प बसू नये. हीच शहीदांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे ते म्हणाले. ज्येष्ठ नागरिक आनंदराव चरडे म्हणाले, पाकिस्तान हा खºया अर्थाने भीती दाखविणारा देश आहे. करनी आणि कथनीत प्रचंड तफावत असून आतंकवाद्यांना खतपाणी घालणाऱ्यांची कदापी गय केली जाणार नाही, हेच आजच्या हल्ल्यातून दिसून आले. नागरिकांनी हा फक्त ट्रेलर असल्याचे समजून पूर्ण चित्रपट अजून बाकी आहे, असे समजावे.
भंडारा आयुध निर्माणीचे सेवानिवृत्त कर्मचारी आनंदराव कुंभारे म्हणाले, भारतीय सैन्य कुठल्याहीबाबतीत कमी नाही. आतंकवाद्यांना पोसणाºया पाकिस्तानला ते केव्हाही धुळ चारू शकतात. भारताच्या संयमाचा बांध फुटला असून पाकिस्तानच्या दुष्कृत्याचा आता घडा फुटला आहे. मला भारतीय सैन्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. नेत्रतज्ज्ञ डॉ. योगेश जिभकाटे म्हणाले, आज देशाची सेना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सैन्यापुढे आम्ही नतमस्तक आहो, असे सांगत ते म्हणाले, 'गाफिल ठेवले बाहेरील व घरातील शत्रुला, हाणीले त्यांच्याच घरी नाठाळाला, झाली अशी कोंढी, अशी नाचक्की उघडपणे म्हणता येई ना पाकला हल्ल झाला.'
आदिवासी पिपल्स फेडरेशनचे कार्याध्यक्ष अशोक उईके म्हणाले, नेहमी हल्ले करणाºयांना भारतीय सैन्याने धडा शिकविला. पुलवामा घटनेचा बदला घेतला याचा मनस्वी आनंद असून भारतीय सैन्य अभिनंदनास पात्र आहेत. खिळेमुक्त वृक्ष चळवळीचे राजेश राऊत म्हणाले, ही तर सुरूवात आहे. भारतीय नागरिक शांत आणि संयमी आहे. कोणत्याही घटनेवर तात्काळ प्रतिक्रिया देत नाही. मात्र कुणी त्याच्या स्वाभीमानावर घाला घातला तर सहनही करत नाही. पुलवामा येथील हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयांच्या मनात असलेला राग आज भारतीय वायूसेनेने हल्ला करून काही प्रमाणात कमी केला. भारतीय वासूसेनेच्या कारवाईचा मनस्वी आनंद आहे. जे.एम. पटेल महाविद्यालयाची विद्यार्थीनी प्रतीक्षा लांजेवार म्हणाली, पाकिस्तानला धडा शिकविला याचा आनंद झाला.
भारताकडे वाईट नजरेने पाहणाºयांचे काय होवू शकते हे भारतीय सैन्याने आजच्या हवाई हल्ल्यातून दाखवून दिले. तर याच महाविद्यालयातील विद्यार्थीनी मेघना लांडगे म्हणाली, पुलवामा हल्ल्याच्या तेराव्या दिवशी भारतीय विमानांनी पाकिस्तानमध्ये घुसून आतंकवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले. ही बातमी जेव्हा कळली तेव्हा मन उचंबळून आले. भारतीय सैन्याबद्दल अभिमान आहेच. या घटनेने तर त्यात आणखी भर पडली, असे तिने सांगितले. आर्यन चुऱ्हे म्हणाला, भारतीय वायुदलाने पाकव्याप्त काश्मिरात शिरून पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला. आता एकऐक आतंकवादी शोधून त्यांना ठेचून काढले पाहिजे. भारताकडे वाईट नजरेने कुणीही पाहणार नाही, अशी कारवाई भारतीय सैन्याने करावी. भारतीय सैन्याचा मला खूप अभिमान आहे. जयंत बोटकुले म्हणाले, आतंकवाद्यांना चांगला धडा शिकविला. यामुळे पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या आत्म्याला शांती मिळेल. आता तरी पाकिस्तानने शिकावे आणि कुरापती करणे बंद कराव्या. सामाजिक कार्यकर्ते नितीन दुरगकर म्हणाले, पाकिस्तानला यापुर्वीच धडा शिकविण्याची गरज होती. भारतीय परंपरा व संस्कृती सर्व जगात महान आहे. शांततेचा संदेश देणारी आहे. मात्र कुणी आमची कुरापत काढत असेल तर त्याला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. हेच आजच्या भारतीय सैन्याच्या कारवाईतून दिसून आले. भारतीय सैन्याच्या शौर्याला माझा सॅल्युट.

पवनीत फटाके फोडून आनंदोत्सव
पवनी : येथील इंदिरा गांधी चौकात जवाहर गेटसमोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भाजपाच्यावतीने भारतीय वायूसेनेचे कौतुक करण्यासाठी फटाके फोडण्यात आले. यावेळी हातात तिरंगा झेंडा घेवून विजयोत्सव साजरा केला. पाकिस्तान विरोधी नारे देण्यात आले. यावेळी मच्छिद्र हटवार, सुरेश अवसरे, दत्तू मनरत्तीवार, अमोल तलवारे, दीपक बावनकर, सुनील जीवतारे, किशोर जिभकाटे, हरीष बुराडे, स्रेहांकीत गोटेफोडे, योगेश बावनकर, संघर्ष अवसरे, मयुर तलमले, जंजीर हटवार आदी उपस्थित होते.

Web Title: Boundaries of valor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.