पवनी नगराची सीमावाढ हा ऐतिहासिक निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 01:23 AM2018-03-30T01:23:14+5:302018-03-30T01:23:14+5:30
नगराच्या विकासासाठी सीमावाढ ही अत्यंत महत्त्वाची बाब होती. सीमावाढीमुळे शासन स्तरावरुन मोठया प्रमाणात निधीची उपलब्धता होवून नगरातील कित्येक कामे मार्गी लागणार आहेत.
ऑनलाईन लोकमत
पवनी : नगराच्या विकासासाठी सीमावाढ ही अत्यंत महत्त्वाची बाब होती. सीमावाढीमुळे शासन स्तरावरुन मोठया प्रमाणात निधीची उपलब्धता होवून नगरातील कित्येक कामे मार्गी लागणार आहेत. एकशे पन्नास वर्षे पूर्ण झालेल्या नगरपरिषद साठी नगराची सीमावाढ हा ऐतिहासिक निर्णय आहे असे प्रतिपादन आमदार अॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले.
नगराच्या सीमावाढीची अधिसुचना प्रसिध्द झाल्यानंतर हर्षोल्लास साजरा करुन शासनाचे आभार व्यक्त करण्यासाठी न.प. सभागृहात तातडीची सभा आयोजित करण्यात आली. सभेत प्रमुख अतिथि म्हणून बोलतांना आ. अॅड. रामचंद्र अवसरे यांनी पक्ष निवडणूीपुरता असतो लोकप्रतिनिधींनी निवडणूकीनंतर सर्वांचे काम करावे असा माझा प्रामाणिक मत आहे. त्यामुळेच नगरविकास आघाडीची न.प. मध्ये सत्ता असूनही विकासकामासाठी मी सोबत आहे. नगरासाठी स्वच्छ व शुध्द पाणी पुरवठा योजना, भुयारी गटार योजना, भुयारी विद्युत पुरवठा योजना, पर्यटन व शैक्षणिक विकास तसेच पुरातन वस्तू संग्रहालय या लोकहिताच्या कामासाठी मी सदैव तत्पर आहे असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रमुख अतिथी म्हणून आ. रामचंद्र अवसरे, नगराध्यक्षा पुनम काटेखाये, उपाध्यक्ष कमलाकर रायपूरकर, नगर विकास आघाडीचे अध्यक्ष विलासराव काटेखाये, मुख्याधिकारी माधुरी मडावी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना विलासराव काटेखाये यांनी सव्वा वर्षापुर्वी नगर विकास आघाडीचे निवडणूक जाहिरनामा प्रसिध्द करुन दिलेल्या वचनांची पूर्तता करणे सुरु केले आहे. नगराची सीमा वाढ हा त्यापैकीच एक महत्वपूर्ण काम असल्याचे सांगून यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ.अॅड़ रामचंद्र अवसरे, आ.डॉ. परिणय फुके यांचे मौलीक सहकार्य लाभल्याचे सांगून कृतज्ञता व्यक्त केली. उपाध्यक्ष कमलाकर रायपूरकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात पवनीला कृषी महाविद्यालय व शासकीय तंत्र शिक्षण महाविद्यालयाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्षा पुनम काटेखाये यांनी नगराच्या विकासाचे पर्व सुरु झाले आहे. नगरात स्वच्छतेला महत्व दिले आता स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करण्यासाइी प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी शहर काँगे्रसचे अध्यक्ष मनोहर उरकुडकर, नगरसेविका अनुराधा बुराडे, दिलीप वाणी, डॉ. भागवत आकरे, अशोक पारधी यांनी नगराचे सीमा वाढ प्रकरणी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी केले. संचालन अनिल धारगावे यांनी तर आभार शाखा अभियंता मंगेश बोंदरे यांनी मानले. सर्व नगरसेवक नगर विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, व्यापारी बांधव व नागरिक यावेळी उपस्थित होते.