आरक्षणाने केला अपेक्षापूर्तीचा भंग

By Admin | Published: November 28, 2015 01:45 AM2015-11-28T01:45:50+5:302015-11-28T01:45:50+5:30

राजकारणात अपेक्षा पूर्ण होतीलच असं काही नाही. एखाद्या पदावर जाण्यासाठी आटापिटा करतो त्याला तिथपर्यंत पोहचता येत नाही.

The breach of the expected requirement of the reservation | आरक्षणाने केला अपेक्षापूर्तीचा भंग

आरक्षणाने केला अपेक्षापूर्तीचा भंग

googlenewsNext

आरक्षणाने केला अपेक्षापूर्तीचा भंग
राजू बांते  मोहाडी
राजकारणात अपेक्षा पूर्ण होतीलच असं काही नाही. एखाद्या पदावर जाण्यासाठी आटापिटा करतो त्याला तिथपर्यंत पोहचता येत नाही. आणि न मागताही पदरात पडते त्यालाच राजकारणात राजयोग म्हटलं जाते. असंच काही घडलं मोहाडीत. नगराध्यक्ष पदावर शिक्कामोर्तब झालेल्या एका नेत्याला निवडणुकीत जिंकता आली नाही तर दुसरा जिंकूनही त्याच्या राजयोगात आरक्षणाचा अडसर आल्याने अपेक्षेचा पाचोळा झाला आहे.
राजकारणात भल्याभल्यांचे स्वप्न अपूर्ण राहतात. राजसत्तेसाठी जीवापाड मेहनत करूनही मतदार घरची वाट दाखवितात. वर्तमानात राजकारण करणारे भविष्याची स्वप्ने बघतात. पुढं आपलं भलं होईल याच अपेक्षेने सर्वबाजूने शक्तीपणाला लावतात. पण, राजकारणात केलेल्या विचाराच्या उलटच घडत असतं.
असंच घडलं मोहाडी येथील नगर पंचायतच्या निवडणुकीत. पंचायत समितीचे उपसभापती खुशाल कोसरे यांच्या बाबतीत विपरीत घडलं. जनतेच्या कामासाठी धावून जाणारा, नागरिकांची कामे करणारा अशी कोसरे यांनी स्वकतृत्वाने ओळख निर्माण केली. याच भरवशावर जनता निवडून देईल, अशी अपेक्षा कोसरे यांना होती. भाजपाच्या हवेत नगर पंचायतीवर आपलाच कब्जा राहिल, ही शाश्वती भाजपा नेत्यांना होती. भाजपची नगर पंचायतवर सत्ता आली तर नगराध्यक्ष म्हणून खुशाल कोसरे बनणार अशी भाजपाच्या गोटात चर्चा होती. पण, निवडणुकीत उलटफेर झाला. खुशाल कोसरेसाठी भाजपाचे सर्व नेते, कार्यकर्ते मेहनत घेत होते. भाजपांनी कासेरे यांची जागा प्रतिष्ठेची केली होती. भाजपाने राजकारणातील सर्व सोपस्कार केले. मात्र, खुशाल कोसरे यांना जनतेनी नाकारले. ज्या जागेवर भाजपाने पूर्ण भरवसा केला होता. तिच जागा पराभूत झाली. एकंदर नगराध्यक्षपदाची स्वप्ने भाजपाने बघितलेल्या उमेदवाराचा अपेक्षाभंग झाला. आधीच मोहाडीत काँग्रेसला अनुकूल वातावरण तयार झाले होते. त्यामुळे नगरपंचायतवर काँग्रेसची सत्ता येईल, असे काँग्रेस नेत्यांना शाश्वती होती. काँग्रेसचे माजी सरपंच सुनिल गिरीपुंजे हे एकमेव नगराध्यक्षपदाचे दावेदार होते. त्यामुळे सुनिल गिरीपुंजे यांना निवडून येण्यापासून रोखायचे, अशी राष्ट्रवादी खेळी होती. पण, सुनिल गिरीपुंजे हे मोठ्या फरकाने निवडून आले.
पण... आरक्षणाने गिरीपुंजे यांचा घात केला. ज्या गिरीपुंजेसाठी काँगे्रेसमध्ये एकमत झाले होते. ते सगळे धुळीला मिळाले. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण निघाल्याने गिरीपुंजे यांचा अपेक्षाभंग झाला. नगराध्यक्ष बनण्यासाठी स्वप्ने बघणारे खुशाल कोसरे यांना मतदारांनी वाट दाखविली तर दुसरे सुनिल गिरीपुंजे यांना आरक्षणाने दगा दिला. दोघांचेही नगराध्यक्ष बनण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.
महिला आरक्षण आल्याने रागिनी सेलोकर मोहाडीच्या नगराध्यक्ष बनणार अशी चर्चा होती. सेलोकर यांनी काँग्रेस नेत्यांकडे तशी इच्छाही बोलून दाखविली होती. राजकारणात इच्छा, आकांक्षा चालत नाही. इथे चालतात डावपेच. अन् असचं घडल. काँगे्रसकडे चार महिला नगराध्यक्ष पदासाठी दावेदार होत्या. चारपैकी एकाची नगराध्यक्षपदासाठी वर्णी लागेल अस होत. पण, कोण... याची उत्सुकता होती. रागिणी सेलोकर की स्वाती निमजे. अखेर स्वाती निमजे यांच्या नावावर काँग्रेसने शिक्कामोर्तब करण्यात आले.
काँग्रेसने एकाच महिला नगरसेवकाचा नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशन दाखल केला. स्वाती निमजे यांचा अर्ज दाखल झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी सुस्कारा सोडला. ज्या स्वाती निमजे निवडून येतील काय याची साशंकता होती. त्या आता मोहाडीच्या प्रथम महिला नगराध्यक्ष बनणार आहेत. सध्या त्यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र असल्याने आता नगराध्यक्षपदासाठी स्वाती निमजे यांची ३० नोव्हेंबरला घोषणा होणे तेवढे शिल्लक आहे. यालाच म्हणतात राजयोग. ज्यांनी मागितलं नाही. स्वप्ने बघितली नाही ते आपसूक पदरात पडते. राजकारणात असंच काहीसं घडतं असतं.

Web Title: The breach of the expected requirement of the reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.