आरक्षण सोडतीने इच्छुकांचा अपेक्षा भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:00 AM2021-02-06T05:00:00+5:302021-02-06T05:00:37+5:30

भंडारा जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, लाखांदूर, साकोली आणि पवनी तहसील कार्यालयात काढण्यात आली. सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत असली तरी नागरिकांची गर्दी सकाळी १० वाजतापासूनच तहसील कार्यालयाच्या परिसरात दिसत होती. सर्वाधिक उत्सुकता होती ती १५ जानेवारी रोजी झालेल्या १४८ ग्रामपंचायतीमधील नागरिकांना. निवडणूक झाल्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने इच्छुकांमध्ये उत्सुकता दिसत होती.

Breaking the reservation breaks the expectations of the aspirants | आरक्षण सोडतीने इच्छुकांचा अपेक्षा भंग

आरक्षण सोडतीने इच्छुकांचा अपेक्षा भंग

googlenewsNext
ठळक मुद्देसरपंच आरक्षण : अनेक गावांत बहुमत एका गटाला आणि सरपंचपद दुसऱ्याला

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : बहुप्रतीक्षित सरपंचपदाचीआरक्षण सोडत शुक्रवारी जाहीर झाली आणि अनेक दिवसांपासून सरपंच पदाचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांच्या अपेक्षा भंग झाला. काही ग्रामपंचायतीमध्ये तर बहुमत एका गटाला आणि सरपंचपद दुसऱ्या गटाला अशी अवस्था झाली आहे. जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत संबंधित तहसील कार्यालयात काढण्यात आली. नुकत्याच झालेल्या १४८ ग्रामपंचायतींमध्ये या सोडतीची प्रचंड उत्सुकता असल्याने  नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
भंडारा जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, लाखांदूर, साकोली आणि पवनी तहसील कार्यालयात काढण्यात आली. सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत असली तरी नागरिकांची गर्दी सकाळी १० वाजतापासूनच तहसील कार्यालयाच्या परिसरात दिसत होती. सर्वाधिक उत्सुकता होती ती १५ जानेवारी रोजी झालेल्या १४८ ग्रामपंचायतीमधील नागरिकांना. निवडणूक झाल्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने इच्छुकांमध्ये उत्सुकता दिसत होती. तहसील कार्यालयात एका एका ग्रामपंचायतीचे आरक्षण घोषित होत होते तसतसी उत्सुकता शिगेला पाेहाेचत होती. अपेक्षित आरक्षण निघालेले गट उत्साहात जल्लोष करीत होते तर अपेक्षित आरक्षण न निघालेल्या गटाचा हिरमोड झाल्याचे दिसून येत होते. 
जिल्ह्यातील निवडणूक झालेल्या बहुतांश गट ग्रामपंचायती आहेत. सात ते नऊ सदस्य निवडून आले आहे. सरपंचपद कोणत्या प्रवर्गासाठी आहे हे माहीत  नसताना निवडणूक लढविली गेली. शुक्रवारी आरक्षणाची सोडत निघाली. तेव्हा अनेक ठिकाणी बहुमत एका गटाला आणि आरक्षणामुळे सरपंचपद दुसऱ्या गटाला अशी अवस्था झाली होती. काही ग्रामपंचायतीमध्ये तर सरपंचासाठी आरक्षित प्रवर्गातून एकच उमेदवार निवडून आल्याने त्यालाच सरपंच करण्याशिवाय पर्याय नाही.  शुक्रवारी काढण्यात आलेले आरक्षण २०२० ते २०२५ या कालावधीसाठी राहणार आहे. आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठीही शुक्रवारी एकाच वेळी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.

मेहनतीवर पाणी फिरले
 ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येकाने प्रचंड मेहनत घेतली. सरपंचपद आपल्याच गटाला मिळेल, अशी आशा बाळगून निवडणुकीचे नियोजन केले. वारेमाप खर्चही करण्यात आला. मात्र शुक्रवारी घोषित आरक्षणाने अनेकांच्या मेहनतीवर पाणी फेरल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी तुमसर तालुक्यातील ९७, मोहाडी ७५, भंडारा ९४, पवनी ८९, साकोली ६२, लाखनी ७१ आणि लाखांदूर तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. 
आता लक्ष उपसरपंच पदावर 
 आरक्षण सोडतीने सरपंच पदाच्या अपेक्षेवर पाणी फेरले. मात्र स्वस्त बसतील ते गावपुढारी कसले. आता सरपंचपद नाही तर उपसरपंचपद तरी आपल्या गटाला मिळावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात सरपंच आणि उपसरपंचांची निवडणूक पार पडणार आहे. आरक्षण सोडतीनंतर अनेक ठिकाणचा घोडेबाजारही थंड बस्त्यात दिसत आहे.

 

Web Title: Breaking the reservation breaks the expectations of the aspirants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.