मतदानावर बहिष्काराचा फोडला नारळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 10:00 PM2019-04-02T22:00:34+5:302019-04-02T22:00:58+5:30

तीन दशकांपासून प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने गांभिर्याने न घेतल्याने अखेर आज तालुका कृती संघर्ष समितीने मतदानावर बहिष्काराचा नारळ फोडला. निवडणुकीच्या काळात प्रचाराचा शुभारंभ करताना नारळ फोडला जातो. मात्र अड्याळ येथे मंगळवारी प्रचाराऐवजी ग्रामस्थांनी बहिष्काराचा नारळ फोडला.

Breakout coconut breaks out on voting | मतदानावर बहिष्काराचा फोडला नारळ

मतदानावर बहिष्काराचा फोडला नारळ

Next
ठळक मुद्देप्रचार नाही : अड्याळ येथील प्रकार, तालुका निर्मितीवर ग्रामस्थ ठाम

अड्याळ : तीन दशकांपासून प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने गांभिर्याने न घेतल्याने अखेर आज तालुका कृती संघर्ष समितीने मतदानावर बहिष्काराचा नारळ फोडला. निवडणुकीच्या काळात प्रचाराचा शुभारंभ करताना नारळ फोडला जातो. मात्र अड्याळ येथे मंगळवारी प्रचाराऐवजी ग्रामस्थांनी बहिष्काराचा नारळ फोडला.
अड्याळला तालुका म्हणून घोषित करावे या मागणीला घेवून मागील दोन महिन्यांपासून अड्याळ येथे वातावरण तापले आहे. तीन दशकांचा कालावधी लोटूनही कुठल्याही राजकीय पक्षाने ग्रामस्थांच्या मागणीवर गांभिर्याने विचार केला नाही. निवडणुका आल्या की, आश्वासनाचे गाजर दिले जाते. मात्र यावेळी अड्याळसह अन्य गावातील नागरिकांनी आश्वासनाला बळी न पडता निर्णयावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. यात अड्याळ तालुका कृती संघर्ष समिती स्थापन करुन लोकशाही मार्गाने लढा सुरु केला.
दरम्यान व्यापक हितासाठी ग्रामस्थ न्याय मागणी करीत असून अड्याळ तालुका निर्मिती होणार नाही तोपर्यंत कुठल्याही निवडणुकीत आम्ही मतदान करणार नाही, अशी स्पष्ट भुमिका दोन महिन्यांपुर्वी झालेल्या बैठकीत घेण्यात आली होती. त्यानुसारच लोकसभा निवडणुकीवरही ग्रामस्थांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ढोल ताशांच्या गजरात कृती संघर्ष समिती व नागरिकांच्या वतीने येथील प्रसिध्द हनुमान मंदिरात निवडणुकीवर बहिष्काराचा नारळ फोडला.
विशेष म्हणजे याचवेळी या संदर्भातील जाहिर आवाहनाचे पत्रकेही वाटण्यात आली.

Web Title: Breakout coconut breaks out on voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.