उड्डाणपूल बांधकामाला वीज खांबांचा अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:58 AM2019-04-21T00:58:51+5:302019-04-21T00:59:31+5:30
देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपुल बांधकामाकरिता उच्च दाब वीज वाहिण्या अडसर ठरत असल्याची माहिती पुढे आली आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला सीमेंट काँक्रीटचे पिलर उभे करणे सुरु केले आहे. परंतु तिसरा पिल्लर रेल्वे ट्रॅकजवळ बांधकामाकरिता वीज वाहिणीचा मोठा खांब अडसर ठरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपुल बांधकामाकरिता उच्च दाब वीज वाहिण्या अडसर ठरत असल्याची माहिती पुढे आली आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला सीमेंट काँक्रीटचे पिलर उभे करणे सुरु केले आहे. परंतु तिसरा पिल्लर रेल्वे ट्रॅकजवळ बांधकामाकरिता वीज वाहिणीचा मोठा खांब अडसर ठरला आहे. रेल्वे प्रशासनात त्याला हटविण्याकरिता खलबते सुरु असल्याचे समजते. या मार्गावर रेल्वे मेगाब्लॉग घेतल्याशिवाय पर्याय नसल्याने पर्यायाच्या शोधात आहे.
मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर देव्हाडी रेल्वे क्रॉसींग ५३२ वर उड्डाणपुलांची कामे मागील पाच वर्षापासून संथगतीने सुरु आहेत. रेल्वे तथा राज्य शासन संयुक्तरित्या सदर उड्डाणपुलाचे बांधकाम करीत आहे. रेल्वे विभाग रेल्वे ट्रॅकवरील मुख्य सिमेंट पिल्लर बांधकाम व त्यावरील सिमेंट काँक्रीटचा रस्ता (गडर) तयार करीत आहे. रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला रेल्वेने सिमेंट काँक्रीट पिल्लरचे कामे अंतिम टप्प्यात आहेत. परंतु तिसरा पिल्लर रेल्वे ट्रॅकच्या मधोमध मोकळ्या जागेत उभा करणार आहे. नेमका येथे उच्च वीज वाहिण्यांचा मोठा खांब असल्याने बांधकामास अडथळा निर्माण झाला आहे.
अडसर ठरणारा वीज वाहिण्यांचा खांब हटविण्याकरिता रेल्वेचे स्थापत्य अभियंते व वीज अभियंत्याचे सध्या खलबते सुरु आहेत. मेगा ब्लॉक घेतल्याशिवाय बांधकाम करण्याची येथे अधिक शक्यता आहे. परंतु सिमेंट पिल्लर बांधकाम काही दिवस चालणार आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून दोन रेल्वे ट्रॅक ब्लॉक करून पिल्लरची बांधकाम करण्याचा निर्णय येथे रेल्वेने घेतल्याचे समजते. सध्या रेल्वेचे काम संथगतीने सुरु आहे.
राज्य शासनाचे आतापर्यंत ८० टक्के उड्डाणपुलाचे काम झाले आहे. पुन्हा २० टक्के कामे शिल्लक आहेत. राज्य शासन येथे २५ कोटींचा निधी खर्च करीत आहे. तर रेल्वे येथे १६ कोटींची कामे करीत आहे. राज्य शासनाने आतापर्यंत २२ कोटींची कामे केली असून केवळ तीन कोटींची कामे शिल्लक असल्याचे समजते.
राखेचा बंदोबस्त करावा
उड्डाणपुल भरावात अदानी वीज कारखान्यातील फ्लाय अॅशचा भराव करण्यात आला आहे. फ्लाय अॅश रासायनिक असून पिठासारखी पातळ आहे. उड्डाणपुलांची संरक्षित भिंत दगडांची आहे. दगडातील गॅप (पोकळी)तून पावसाळ्यात फ्लाय अॅश पाण्यासह वाहून पोचमार्गावर पसरते. वाहनाच्या वाहतुकीमुळे ती मोठ्या प्रमाणात हवेत उडते. मानवी शरीराकरिता ती अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे संबंधित विभागाने त्या राखेचा कायम बंदोबस्त करण्याची गरज आहे.
गत पाच वर्षापासून देव्हाडी उड्डाणपुलाची कामे अतिशय संथगतीने सुरु आहेत. सध्या रेल्वे ट्रॅकवरील वीज खांब अडसर ठरत आहे. उड्डाणपुल बांधकामात सतरा विघ्न येथे येत असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उड्डाणपुल तात्काळ पूर्ण करावा.
-इंजि. विपील कुंभारे
महासचिव, भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटी अनुसूचित विभाग, तुमसर.