आंतरराज्यीय मार्गावरील पूल झाला खड्डेमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 05:00 AM2021-06-13T05:00:00+5:302021-06-13T05:00:22+5:30
हा पूल वळण मार्गावर असल्याने त्यामुळे अधिक धोका येथे निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. यापूर्वीही पुलाचा रस्ता व पुलावरील खड्डे या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यात आले होते. परंतु उन्हाळा उलटून गेल्यावरही पुलाचा ॲप्रोच रस्ता व पुलावरील खड्डे बुजविण्यात आले नाहीत. यामुळे या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आंतरराज्य मार्ग असल्यामुळे या रस्त्यावर जड वाहतूकही मोठ्या प्रमाणात आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर - कटंगी आंतरराज्य मार्ग ३५६ वर पवनारा शिवारात केवळ दोन वर्षांपूर्वी कोट्यवधींच्या पुलाचे बांधकाम करण्यात आले. परंतु पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पुलावरील मार्ग खड्डेमय झाला असून खड्ड्यांत पाणी साचले आहे. या पुलाचा ॲप्रोच रस्ता पूर्णत: उखडलेला आहे. त्यामुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात आला आहे. या पुलाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
पवनारा शिवारात दीड ते दोन वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून पूल बांधकाम करण्यात आले. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या पुलाचा रस्ता खड्डेमय झाला असून पुलावरही खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत पाणी साचल्यामुळे पुलावरून वाहतूक करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. खड्डे वाचवताना येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
हा पूल वळण मार्गावर असल्याने त्यामुळे अधिक धोका येथे निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. यापूर्वीही पुलाचा रस्ता व पुलावरील खड्डे या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यात आले होते. परंतु उन्हाळा उलटून गेल्यावरही पुलाचा ॲप्रोच रस्ता व पुलावरील खड्डे बुजविण्यात आले नाहीत. यामुळे या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आंतरराज्य मार्ग असल्यामुळे या रस्त्यावर जड वाहतूकही मोठ्या प्रमाणात आहे. वर्दळीचा रस्ता असल्यामुळे वाहनधारकांना या पुलावरून जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. सार्वजनिक बांधकाम विभागाचे या बांधकामावर नियंत्रण होते. त्या पश्चातही या पुलाची अवघ्या दोन वर्षांत दुरावस्था कशी झाली हा संशोधनाचा विषय आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे ही कायम दुर्लक्ष दिसून येत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.