पूल दुरुस्ती, वृक्षारोपणाची कामे बेरोजगार अभियंत्यांना देणार

By admin | Published: March 29, 2016 12:28 AM2016-03-29T00:28:47+5:302016-03-29T00:28:47+5:30

राष्ट्रीय महामार्गाची व जुन्या पुलांची दुरुस्ती आणि वृक्षारोपण तसेच वृक्ष संगोपनाची कामे यापुढे राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत ...

Bridge repairs, plantation works, unemployed engineers | पूल दुरुस्ती, वृक्षारोपणाची कामे बेरोजगार अभियंत्यांना देणार

पूल दुरुस्ती, वृक्षारोपणाची कामे बेरोजगार अभियंत्यांना देणार

Next

नितीन गडकरी यांचे आश्वासन : बेरोजगार अभियंता संघटनांनी घेतली भेट
भंडारा : राष्ट्रीय महामार्गाची व जुन्या पुलांची दुरुस्ती आणि वृक्षारोपण तसेच वृक्ष संगोपनाची कामे यापुढे राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत सुशिक्षीत बेरोजगार अभियंत्यांना देऊ, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांना दिले.
सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रदीप पडोळे, कार्याध्यक्ष प्रवीण पांडे, महासचिव एम. ए. हाकीम, संपूर्ण महाराष्ट्राचे जिल्हाध्यक्ष व सचिव यांचयासह राज्यातील २६ जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारला नागपुरात गडकरी यांच्या निवासस्थानी संघटनेची बैठक पार पडली. आपल्या समस्या कथन केल्या. राष्ट्रीय महामार्गाची लांबी २२ हजार किमी. पर्यंत वाढविण्यात आली आहे. येत्या पाच वर्षात देशात पाच लाख कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत. ही कामे अद्यावत तंत्रज्ञान व यंत्रसमुग्रीच्या मार्फत सिमेंट काँक्रीटची केली जाणार आहेत. ती करतांना त्या भागातील ठेकेदारांना कामे मिळावीत यासाठी अटी व शर्ती शिथिल करण्यात आल्या आहेत. बीड कॅपोसिटीची अट ५० टक्के शिथिल करण्यात आली असून आज घडीला १०० कोटीची कामे करणाऱ्यांना यापुढे २०० कोटीची कामे करता येतील. राष्ट्रीय महामार्गावर अडीच हजार पुला आहेत, त्याच्या दुरुस्तीसाठी बराच खर्च करावा लागतो, अशा जुन्या पुलांची दुरुस्ती राष्ट्रीय महामार्गावरील वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन आदींची कामे सुशिक्षीत बेरोजगारांना देऊन त्यांनी खचून न जाता हिंमतीने दर्जेदार कामे करावीत, असे आवाहन ना. गडकरी यांनी केले. केंद्रीय मार्ग निधीमधून राज्य शासनाला विविध रस्त्याच्या कामासाठी ४ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमधील कामेही सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना देण्याबाबत आपण राज्य सरकारला सुचवू, असेही गडकरी यांनी सांगितले.
मोहम्मद जाहिद नागपूर, प्रशांत वंजारी, रामपाल सिंग, विवेक गिरणीकर, सुधीर मानकर, सुदीप रोडे, लिकेश गावंडे, दिलीप बाळसकर, प्रशांत जोशी आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Bridge repairs, plantation works, unemployed engineers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.