स्पर्धात्मक परीक्षेतच विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:31 AM2021-02-15T04:31:20+5:302021-02-15T04:31:20+5:30
खांदूर : आधुनिकतेने झपाटलेल्या युगात सर्वांनाच शिक्षणीचे व तंत्राचे वेड लागले असले तरी या युगात तग धरायची असेल तर ...
खांदूर : आधुनिकतेने झपाटलेल्या युगात सर्वांनाच शिक्षणीचे व तंत्राचे वेड लागले असले तरी या युगात तग धरायची असेल तर स्पर्धात्मक परीक्षेतच विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य असल्याचे मत डॉ. महेंद्र गजभिये यांनी व्यक्त केले. ते १३ फेब्रुवारी रोजी भंडारा येथील सामाजिक न्याय भवनातील सभागृहात आयोजीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले, पाया मजबूत असेल तर इमारत उंच होईल, असे सांगताना प्रत्येक विद्यार्थ्याने प्राथमिक शिक्षणापासून माध्यमिक व पदवी शिक्षणापर्यंत कसोशीने प्रयत्न केले पाहिजे. समाजातील कोणी एक पदवीधर अथवा पदव्युत्तर घटक प्रशासकीय सेवेपासून उपेक्षित राहू नये यासाठी प्रत्येकांने शिक्षणाप्रति सामर्थ्यशाली बल दाखविले पाहिजे.
ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण अनेक विद्यार्थी असताना केवळ अजानतेपणामुळे या परीक्षेला पुढे जाण्याची हिम्मत दाखवत नसल्याचे चित्र आहे. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थी व शिक्षक पालकांनी महत्त्वाकांक्षी वृत्ती बाळगत भविष्यात विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेसाठी पात्र ठरावा, असे मतदेखील त्यांनी व्यक्त केले. सदर कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा यांच्या संकल्पनेतून व सहकार्याने तसेच सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभाग भंडारा यांच्याद्वारे विद्यार्थ्यांना राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, केंद्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा तसेच विविध परीक्षांची माहिती व अभ्यासपद्धती मिळण्याच्या हेतूने कार्यशाळेचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमाच्या आयोजनात गणवीर व चव्हाण यांनी मोलाची कामगिरी बजावली.