गाव धूरमुक्त करण्यासाठी उज्ज्वला योजना घरा घरात पोहचवा

By admin | Published: October 22, 2016 12:29 AM2016-10-22T00:29:25+5:302016-10-22T00:29:25+5:30

ग्रामीण भागात गावांना धुरमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने उज्वला गॅस कनेक्शन वाटपाची योजना सुरू केली आहे.

Bring the bright plan home to the village to smoke | गाव धूरमुक्त करण्यासाठी उज्ज्वला योजना घरा घरात पोहचवा

गाव धूरमुक्त करण्यासाठी उज्ज्वला योजना घरा घरात पोहचवा

Next

नाना पटोले यांचे प्रतिपादन : सिहोऱ्यात गॅस कनेक्शन वाटपाचा शुभारंभ
चुल्हाड (सिहोरा) : ग्रामीण भागात गावांना धुरमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने उज्वला गॅस कनेक्शन वाटपाची योजना सुरू केली आहे. गरीब व सामान्य जनतेपर्यंत ही योजना पोहचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.
सिहोरा येथील गॅस ग्रामीण वितरक येथे आयोजित उज्वला गॅस वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाने मंचावर पं.स. सभापती कविता बनकर, माजी सभापती कलाम शेख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे, उपसभापती शेखर कोतपल्लीवार, कृउबाचे उपसभापती डॉ. अशोक पटले, गटनेते हिरालाल नागपुरे, राजेश पटले, संदीप ताले, गॅस वितरक माया संकेश मौरजार, सरपंच नेहा कुंभारे, बंटी बानेवार, मोतीलाल ठवकर, गजानन निनावे, बाळा तुरकर, अंबादास घानतोडे, महादेव ढबाले, राकेश भौरजार उपस्थित होते.
आयोजित कार्यक्रमात सिहोरा परिसरातील नागरिकांना उज्वला गॅस कनेक्सनचे ३५०० कनेक्शन वितरण करण्यात आले आहे. कार्यक्रमात केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी उपक्रमाची माहिती देत ग्रामीण भागात गरजू लाभार्थ्यापर्यंत या योजना पोहचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे नाना पटोले यांनी आवाहन केले.
उज्वला गॅस कनेक्शन वितरणाचा शुभारंभ करण्यात आल्यानंतर सिहोऱ्यात राजर्षी शाहू महाराज अभ्यास केंद्राच्या नविन इमारत बांधकामाचे उद्घाटन खा. नाना पटोले यांचे हस्ते झाले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, ग्रामीण भागात विशेषत: सिहोरा परिसरताील गावा गावात अभ्यास केंद्र स्थापन करण्यात आले असून गरीब व हुशार विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाचे पूर्व तयारी करणारे व्यासपिठ मिळाले आहे.
या अभ्यास केंद्रातून विद्यार्थ्यांनी शासकीय सेवेत रूजू होतारा आकडा शंभरी ओलांडली असून प्रेरणादायी आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन राहुल डोंगरे यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Bring the bright plan home to the village to smoke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.