बीआरएसपीचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 11:00 PM2018-02-07T23:00:44+5:302018-02-07T23:01:26+5:30

ईव्हीएम या इलेक्ट्रॉनिक्स यंत्रातून देशभरात घेण्यात येणाऱ्या निवडणुका विश्वासार्ह नाही. त्यामुळे ईव्हीएमच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या निवडणुका बंद करून बॅलेट पेपरच्या माध्यमातून घेण्यात याव्या,....

BRSP movement | बीआरएसपीचे धरणे आंदोलन

बीआरएसपीचे धरणे आंदोलन

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : लोकशाही सशक्त करा

आॅनलाईन लोकमत
भंडारा : ईव्हीएम या इलेक्ट्रॉनिक्स यंत्रातून देशभरात घेण्यात येणाऱ्या निवडणुका विश्वासार्ह नाही. त्यामुळे ईव्हीएमच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या निवडणुका बंद करून बॅलेट पेपरच्या माध्यमातून घेण्यात याव्या, यासह अन्य मागण्यांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारला आंदोलन करण्यात आले.
लोकशाहीप्रधान भारतातील लोकशाही सशक्त करण्यासाठी देशात होणाऱ्या निवडणुका नि:ष्पक्ष होणे आवश्यक आहे. मात्र ईव्हीएमच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या निवडणुकांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. अनेक प्रगत देशाने ईव्हीएमची विश्वासार्हता फेटाळून लावली आहे. लोकशाहीला तडे जाणार नाही, यासाठी ईव्हीएमच्या माध्यमातून होणारी निवडणूक बंद करून बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेण्यात याव्या. निवडणुकीला पारदर्शक स्वरूप प्राप्त व्हावे व लोकशाहीची होणारी गळचेपी थांबवावी, यासाठी राज्यभर बहुजन रिपब्लिकन सोशालीस्ट पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयसमोर एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विदर्भ महासचिव झेड. आर. दुधकुंवर यांच्या अध्यक्षतेखाली धरणे देण्यात आले. त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले यांच्यामार्फत राष्ट्रपती, प्रधानमंत्री, निवडणूक आयोग, मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. धरणे आंदोलनात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे महासचिव राजेश बोरकर, अध्यक्ष कन्हैया शामकुंवर, डॉ.महेंद्र गणवीर, सुरेश मोटघरे, मनोज बन्सोड, विश्वनाथ भुसारी, चंद्रभान कांबळे, प्रफुल डोंगरे, रत्नाकर नंदागवळी, प्रा. मधुकर ऋषेश्वरी, सोमेश्वर रामटेके, छत्रपाल उके, अनिल भोवते, संदीप मोटघरे, राजेश टेंभूर्णे, सूर्यकांत हुमणे, ऊषा मोटघरे, देवेश शेंडे, गोपाल हुमणे, हेमा गजभिये, अमित जनबंधू, महेश मेश्राम, संदिप खोब्रागडे, अनिल लोनकर, प्रल्हाद रामटेके, मनोज गोस्वामी, सुभाष गवई, निर्भय गायकवाड, जोत्सना गजभिये, शैलेश जांभुळकर आदी उपस्थित होते .

Read in English

Web Title: BRSP movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.