‘बीएसएनएल’ने वाढविली ग्राहकांची डोकेदुखी!

By admin | Published: December 24, 2015 12:38 AM2015-12-24T00:38:14+5:302015-12-24T00:38:14+5:30

भारत संचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) सेवा सद्या शहर तथा परिसरातील ग्राहकांसाठी सोयिस्कर ठरण्याऐवजी डोकेदुखी ठरत आहे.

BSNL raises the headache of customers! | ‘बीएसएनएल’ने वाढविली ग्राहकांची डोकेदुखी!

‘बीएसएनएल’ने वाढविली ग्राहकांची डोकेदुखी!

Next

ग्राहकांमध्ये रोष : सीयूजी प्लॉनमध्ये मोठ्या प्रमाणात बदल
तुमसर : भारत संचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) सेवा सद्या शहर तथा परिसरातील ग्राहकांसाठी सोयिस्कर ठरण्याऐवजी डोकेदुखी ठरत आहे. संवादादरम्यान भ्रमणध्वनी अचानक 'डिसकनेक्ट' होण्याचे प्रकार वाढीस लागल्याने ग्राहकांना नाहक मन:स्ताप सोसावा लागत असून, यामुळे 'बीएसएनएल'प्रती तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या 'मोबाईल'च्या स्पर्धेत विविध खासगी कंपन्यांनी उडी घेतल्याने या क्षेत्रातील कधीकाळी 'दादा' म्हणून गणल्या जाणाऱ्या 'बीएसएनएल'ची ग्राहक संख्या पुर्वीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घसरली आहे. असे असताना भारत संचार निगमने आपला कारभार सुधारण्याऐवजी अधिकच समस्या निर्माण करुन ठेवल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे. रिसोडमध्ये सद्या 'बीएसएनएल मोबाईल सीम' वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या सुमारे १० हजार आहे. त्यातुलनेत 'लॅन्डलाईन' ग्राहकांची संख्या मात्र संपूर्ण तालुक्यात हजारापेक्षाही कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तथापि, ग्राहकांच्या सेवेत सदैव अग्रेसर राहण्याची वल्गना करणाऱ्या 'बीएसएनएल'चा कारभार गेल्या अनेक महिण्यांपासून खोळंबला आहे.
शहरात सद्या खासगी मोबाईल कंपन्यांसह 'बीएसएनएल'चे टॉवर उभे आहेत. असे असले तरी ग्राहकांचा अधिक कल बीएसएनएल आणि खासगी कंपनीचे सीम वापरण्याकडे असल्याचे दिसून येत आहे. गत तीन वर्षांपूर्वी 'बीएसएनएल'ने सीयुजी प्लान सुरु करुन ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केले होते. खास शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आली.
परिणामी, सवर्सामान्य ग्राहकांसोबतच खेड्यापाड्यांमधील शेतकऱ्यांनी इतर कंपन्यांकडे पाठ फिरवून 'बीएसएनएल'च्या सीयुजी प्लानला सर्वाधिक पसंती दिली. मात्र, काही दिवसांतच 'बीएसएनएल'ने सीयूजी प्लानमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करुन सुविधा कमी केल्या. त्यामुळे ग्राहकांना दरमहा आर्थिक भूर्दंड बसण्यासोबतच 'बीएसएनएल'च्या सेवेतील व्यत्ययामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: BSNL raises the headache of customers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.