बीएसएनएलच्या ‘मंद’ गतीचा मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 10:21 PM2019-02-05T22:21:21+5:302019-02-05T22:21:41+5:30

सर्वत्र आॅनलाईन व्यवहार झाल्याने इंटरनेटची आवश्यकता असते. बहुतांश कार्यालयात शासनाच्या अखत्यारितील भारत संचार निगमची (बीएसएनएल) सेवा आहे. मात्र गत महिन्याभरापासून बीएसएनएलच्या इंटरनेटची गती मंदावल्याने ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. कुणी तक्रार केली तर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. या सर्व प्रकाराला कंटाळून जिल्हा बँकेने तर आता खाजगी कंपनीची इंटरनेट सेवा घेतली आहे.

BSNL's 'slow' pace of condolence | बीएसएनएलच्या ‘मंद’ गतीचा मनस्ताप

बीएसएनएलच्या ‘मंद’ गतीचा मनस्ताप

Next
ठळक मुद्देलिंक फेलचे ग्रहण : जिल्हा बँकेने केली पर्यायी व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सर्वत्र आॅनलाईन व्यवहार झाल्याने इंटरनेटची आवश्यकता असते. बहुतांश कार्यालयात शासनाच्या अखत्यारितील भारत संचार निगमची (बीएसएनएल) सेवा आहे. मात्र गत महिन्याभरापासून बीएसएनएलच्या इंटरनेटची गती मंदावल्याने ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. कुणी तक्रार केली तर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. या सर्व प्रकाराला कंटाळून जिल्हा बँकेने तर आता खाजगी कंपनीची इंटरनेट सेवा घेतली आहे.
भंडारा जिल्ह्यात सर्वत्र बीएसएनएलचे जाळे आहेत. सर्व शासकीय कार्यालयासह बँकांमध्ये बीएसएनएलचीच सेवा घेतली जाते. परंतु गत महिन्याभरापासून बीएसएनएलची सेवा ठेपाळली आहे. वारंवार लिंक फेल होत असल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. राष्टÑीयकृत बँकासह विविध शासकीय कार्यालयातील कामकाजही ठप्प पडते. नागरिकांच्या रोषाचा सामना या ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना करावा लागतो. याबाबत संबंधितांनी वारंवार बीएसएनएलकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्याऐवजी विविध कारणे सांगितले जातात. केबल तुटला आहे, दुरुस्तीचे काम सुरु आहे, असे ठेवणीतील उत्तर दिले जाते.
सर्वाधिक फटका ग्रामीण भागात असलेल्या जिल्हा बँकेच्या शाखांना बसत आहे. विविध कामांसाठी आलेल्या ग्राहकांना विशेषत: शेतक-यांना मनस्ताप सहन करावा लागतो. लिंक मिळत नसल्याने कर्मचारी ठप्प बसून असतात. याठिकाणी ग्राहकांची मोठी गर्दी होत असल्याने वादाचे प्रसंग निर्माण होतात. बीएसएनएलच्या कारभाराचा मनस्ताप मात्र याठिकाणी कार्यरत कर्मचाºयांना सोसावा लागतो. याप्रकाराला कंटाळून जिल्हा बँकेने आता आपल्यासर्व शाखांमध्ये रिलायन्सीची सेवा घेण्याचे ठरविले आहे. १४ शाखांमध्ये रिलायन्सची सेवा घेण्यात आली असून इतर ठिकाणीही ही सेवा लवकरच घेतली जाणार आहे.

बीएसएनएल कार्यालयाला वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. प्रत्येक वेळी नवीन कारण सांगितले जाते. त्यामुळे आम्ही पर्यायी व्यवस्था केली आहे. बीएसएनएलच्या विरोधात केंद्र सरकारकडे रितसर तक्रार करण्यात येईल. ग्राहकांना होत असलेल्या त्रसाबद्दल आम्ही दिलगिर आहोत.
- सुनील फुंडे, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक, भंडारा

Web Title: BSNL's 'slow' pace of condolence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.