जिल्ह्यात ग्रामपंचायतच्या ३६२ जागा बसपा लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:24 AM2017-08-25T00:24:40+5:302017-08-25T00:26:06+5:30

सध्या सर्वत्र दुष्काळसदृश स्थिती असताना सरकारकडून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. कर्जमाफीची फसवी घोषणा करून नागावले जात आहे.

BSP will fight 362 seats in the Gram Panchayat in the district | जिल्ह्यात ग्रामपंचायतच्या ३६२ जागा बसपा लढविणार

जिल्ह्यात ग्रामपंचायतच्या ३६२ जागा बसपा लढविणार

Next
ठळक मुद्देपत्रपरिषद : राजेश नंदूरकर यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सध्या सर्वत्र दुष्काळसदृश स्थिती असताना सरकारकडून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. कर्जमाफीची फसवी घोषणा करून नागावले जात आहे. ग्रामीण विकासाच्या नावावर आश्वासनेच दिली जात आहेत. याविरोधात जनमाणसात संताप आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी बहुजन समाज पक्ष हा बहुजन समाज पॅनलखाली ग्रामपंचायतीच्या ३६२ जागा लढविणार आहे, अशी माहिती बसपाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश नंदूरकर यांनी पत्रपरिषदेत दिली.
ग्रामीण भागातील जनतेत सरकारप्रती असंतोष आहे. अनेक ठिकाणी पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यांना मोबदला मिळाला नाही. व्याघ्र प्रकल्पाच्या समस्या कायम आहेत. याशिवाय ग्रामस्वच्छता, आरोग्य, शिक्षण आदी बाबतीत राज्य सरकार अपयशी ठरली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने बियर बारसाठी आखलेली ५०० मिटरची मर्यादा ही तरुणांसाठी धोकादायक आहे. या मर्यादेमुळे सर्वाधिक दारू दुकाने ही ग्रामीण भागात उघडले जाऊन तिथे अनेक समस्या निर्माण होणार आहेत. या सर्व प्रकाराला विरोध करण्यासाठी तसेच जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी बसपा प्रयत्न करणार आहे. शहरी भागातील नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी नगर परिषदांकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे डॉ. नंदूरकर म्हणाले. पत्रपरिषदेला बसपाचे जिल्हा महासचिव शशिकांत भोयर, जि.प. सदस्य रेखा भुसारी, शहर अध्यक्ष निरंजन दलाल, पवनी शहर अध्यक्ष राजाराम गणविर, संजय सावरकर, शबाना शेख, प्रिया शहारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: BSP will fight 362 seats in the Gram Panchayat in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.