‘बीटीबी’ने भाजी उत्पादकांना मिळते घामाचे दाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 09:41 PM2018-09-29T21:41:11+5:302018-09-29T21:41:34+5:30

शेतात पिकलेल्या पालेभाज्यांना बाजारात भाव मिळत नाही, अशी कायम ओरड शेतकऱ्यांची असते. परंतु भंडारा जिल्हा याला अपवाद आहे. येथे स्थापन झालेल्या ‘बीटीबी’ सब्जीमंडी असोसिएशनमुळे भाजी उत्पादकांना त्यांच्या घामाचे दाम योग्य मोबदल्यासह मिळत आहे.

BTB gets vegetable producers sweaty prices | ‘बीटीबी’ने भाजी उत्पादकांना मिळते घामाचे दाम

‘बीटीबी’ने भाजी उत्पादकांना मिळते घामाचे दाम

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांची गर्दी : स्थानिक भाजीपाल्यामुळे ग्राहकांनाही किफायतशीर

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शेतात पिकलेल्या पालेभाज्यांना बाजारात भाव मिळत नाही, अशी कायम ओरड शेतकऱ्यांची असते. परंतु भंडारा जिल्हा याला अपवाद आहे. येथे स्थापन झालेल्या ‘बीटीबी’ सब्जीमंडी असोसिएशनमुळे भाजी उत्पादकांना त्यांच्या घामाचे दाम योग्य मोबदल्यासह मिळत आहे. तर स्थानिक भाजीपाला ग्राहकांनाही किफायतशिर भावात उपलब्ध होत आहे. त्यामुळे या बाजारात भाजीपाला विकण्यासाठी शेतकºयांची तोबा गर्दी असते.
भंडारा शहरातील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात बीटीबी सब्जीमंडी नावारुपास आली आहे. ताज्या भाजीपाल्याची उत्तम बाजारपेठ म्हणून जिल्ह्यातच नव्हे तर परजिल्ह्यातही ओळख झाली आहे. वैनगंगा आणि चुलबंद नदीच्या खोºयातील ताजा भाजीपाला दररोज या ठिकाणी विक्रीसाठी आणला जातो. जिल्ह्यातील आणि बाहेरच्या जिल्ह्यातील व्यापारीही येथे खरेदीसाठी येतात. स्थानिक स्तरावर बाजारपेठ आणि योग्य किंमत मिळत असल्याने शेतकऱ्यांची मुस्कटदाबीही थांबली आहे. बीटीबीचे अध्यक्ष बंडू बारापात्रे यांच्या दूरदृष्टीने भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळाली आहे. दुसरीकडे ग्राहकांनाही शुद्ध आणि किफायतशीर भावाने भाजीपाला मिळत आहे.
जिल्ह्यातील वांगे, टमाटर, मिरची, भेंडी, दोडका याची दररोज आवक होते. पाठविण्याचा आणि वाहतुकीचा खर्च न लागता स्थानिक बाजारात किफायतशीर भावात भाजीपाला उपलब्ध होत आहे. सध्या या बाजारात वांगे, मिरची, टमाटर, सांबार, दोडका, भेंडी, फुलकोबी याची मोठी आवक आहे. वांग्याला प्रतिकिलो ६ ते १० रुपये दर मिळत आहे. मिरची १८ ते २० रुपये प्रतिकिलो, टमाटर ८ ते १२ रुपये, सांबार ३० ते ३५ रुपये, दोडके १० ते २० रुपये, भेंडी १२ ते १४ रुपये, फुलकोबी १० ते १२ रुपये प्रतिकिलोचे दर शेतकºयांना मिळत आहे.

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी त्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून बीटीबीची स्थापना करण्यात आली. ११ लोकांची समिती यावर नियंत्रण ठेवते. दररोजच्या आवकाने कुटुंबाची बेरोजगारी दूर होत आहे. घरच्यांनाही काम मिळत आहे. तसेच जिल्ह्यातील पैसा जिल्ह्यातच थांबत असल्याने विकासाला दिशा मिळाली आहे.
बंडू बारापात्रे, अध्यक्ष बीटीबी सब्जीमंडी, भंडारा.

Web Title: BTB gets vegetable producers sweaty prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.