‘बीटीबी’तर्फे खासदारांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 12:46 AM2019-06-06T00:46:34+5:302019-06-06T00:47:27+5:30

येथील ‘बीटीबी’ भाजीमंडी आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्यावतीने भंडारा-गोंदियाचे नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांचा मंगळवारी एका सोहळ्यात सत्कार करण्यात आला. लोकसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबध्द असल्याचे ग्वाही सत्काराला उत्तर देताना खासदार मेंढे यांनी दिली.

BTB honors MPs | ‘बीटीबी’तर्फे खासदारांचा सत्कार

‘बीटीबी’तर्फे खासदारांचा सत्कार

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्यांचे आयोजन : सर्वांगीण विकासाची दिली ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : येथील ‘बीटीबी’ भाजीमंडी आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्यावतीने भंडारा-गोंदियाचे नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांचा मंगळवारी एका सोहळ्यात सत्कार करण्यात आला. लोकसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबध्द असल्याचे ग्वाही सत्काराला उत्तर देताना खासदार मेंढे यांनी दिली.
भंडारा-गोंदिया जिल्हा धानाचा, वनाचा आणि तलावाचा आहे. यात सकारात्मक बदल घडवून शेतकºयांना अधिकाधिक फायदा कसा होईल, यासाठी खासदारांनी उपस्थित शेतकºयांशी संवाद साधला. जिल्हा वर्षभर पाणीदार राहावा. नदीजोड प्रकल्पाला न्याय मिळावा. गोसे प्रकल्पाचा कालव्याचे विस्तारीकरण करावे, धान व इतर पिकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी आदी मागण्या यावेळी शेतकºयांनी खासदाराजवळ केल्या. बीटीबीच्या माध्यमातून भाजीपाल्यात समृध्दी आली आहे.
दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला घेऊन येतात, अशा पध्दतीने विकासात्मक कामावर भर देणार असल्याचे खासदार मेंढे म्हणाले. पिण्याचे पाणी, घरकुल, सिंचन, उद्योग आदींना आपण प्राधान्य देवून सर्वंकष विकासासाठी कटीबध्द असल्याचे सांगितले.
यावेळी खासदार सुनील मेंढे, शुभांगी मेंढे या दाम्पत्यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. बीटीबीचे अध्यक्ष बंडू बारापात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेतकऱ्यांच्यावतीने हा सत्कार करण्यात आला.
यावेळी बीटीबीच्या सचिव पौर्णिमा बारापात्रे, सुधीर धकाते यांच्यासह तुळशीराम देशकर, प्रकाश मस्के, कैलाश मेहर, ताराचंद गायधने, नाजुक गायधने, डॉ. संजय एकापुरे, प्राध्यापक हेमंत देशमुख, प्रदीप दिवे, लक्ष्मीण सिंगोरे, राहुल कडव, प्रशांत सागर, घनश्याम भेदे, विजय हटवार, शंकर गायधने उपस्थित होते. संचालन राकेश हुकरे यांनी तर आभार प्रदीप दिवे यांनी मानले. या सोहळ्याला सब्जीमंडीचे व्यापारी, हमाल, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: BTB honors MPs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.