बुद्ध जगातल्या सर्वश्रेष्ठ सभ्यतेचे नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:27 AM2021-05-30T04:27:45+5:302021-05-30T04:27:45+5:30
अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष अशोक ...
अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष अशोक बुरबुरे, अमृत बन्सोड, व्याख्यानमालेतील सहभागी व्याख्याते डॉ. प्रकाश खरात, डॉ. वंदना महाजन, भदंत पंय्याबोधी थेरो तसेच संयोजक प्रशांत वंजारे, समन्वयक गंगाधर ढवळे आणि डॉ. जे. टी. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
२२ ते २६ मे या पाचदिवसीय व्याख्यानमालेचे पहिले पुष्प झेन मास्टर सुदस्सन पुणे यांनी ‘आधुनिक सायन्स आणि बुद्ध धम्म’ या विषयावर गुंफले. दुसरे पुष्प नागपूरचे डॉ. प्रकाश खरात यांनी ‘आधुनिक बुद्ध धम्म आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर गुंफले. तिसरे पुष्प मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. वंदना महाजन ‘बुद्धांचा स्त्रीवाद’ या विषयावर गुंफत असताना बुद्धांनी मोक्षाऐवजी मुक्तीचा विचार मांडून व स्त्रियांना संघात प्रवेश देऊन स्त्री स्वातंत्र्य उजागर केले, असे भाष्य केले. चवथे पुष्प ‘बुद्धाचा दु:खनिरोध’ या विषयावर गुंफताना नांदेड येथील भदंत पंय्याबोधी थेरो म्हणाले की, जगात दु:ख आहे व हे दु:ख बुद्धाच्या अष्टांगिक मार्गानेच दूर होऊ शकते.
या व्याख्यानमालेसाठी महामंडळाचे अध्यक्ष अशोक बुरबुरे, पदाधिकारी अमृत बन्सोड, संयोजक प्रशांत वंजारे, समन्वयक गंगाधर ढवळे, अरविंद निकोसे, सीमा मेश्राम, छाया खोब्रागडे, डॉ. सुरेश खोब्रागडे, सुनंदा बोदिले, संजय डोंगरे, देवानंद सुटे व सदस्य महेंद्र गडकरी, गुलशन गजभिये, महादेव मेश्राम, डी. एफ. कोचे, ॲड. डी. के. वानखेडे, आहुजा डोंगरे, इंजि. रूपचंद रामटेके, डॉ. के. एल. देशपांडे, करण रामटेके, मन्साराम दहिवले, मोरेश्वर गेडाम, अर्जुन गोडबोले आदींनी सहकार्य केले आहे.