वाघ नदीवर बंधारा बांधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 01:16 AM2018-04-25T01:16:55+5:302018-04-25T01:16:55+5:30

राज्य सीमेवर असलेल्या सालेकसा-आमगाव परिक्षेत्रातून वाहणाऱ्या वाघ नदीच्या ओसाड पात्रामुळे सिंचन व पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. वाघ नदीवर बंधारा प्रकल्पाचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी जनतेने केली आहे. या प्रकल्पामुळे .....

Build a bandage on the Wagh river | वाघ नदीवर बंधारा बांधा

वाघ नदीवर बंधारा बांधा

Next
ठळक मुद्देप्रकल्प मागणी प्रस्ताव : सिंचन व पाणीटंचाईला मिळणार जीवन

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : राज्य सीमेवर असलेल्या सालेकसा-आमगाव परिक्षेत्रातून वाहणाऱ्या वाघ नदीच्या ओसाड पात्रामुळे सिंचन व पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. वाघ नदीवर बंधारा प्रकल्पाचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी जनतेने केली आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांसाठी सिंचन व पाणी टंचाईला नवजीवन मिळणार आहे.
आमगाव व सालेकसा तालुक्यातील राज्य सीमेवर वाघनदीमधून जलस्त्रोताचे मोठे साधन आहे. परंतु या नदीवर सिंचनासाठी बंधारे प्रकल्प उभारले नसल्याने सिंचनासाठी वाव नाही. परिणामी मोठे जलस्त्रोत जवळ असून दरवर्षी या परिक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी मिळत नाही. पाणी टंचाईमुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. पाणी टंचाई असल्यामुळे शेतकºयांना ओलीत शेतीमध्ये पीक घेण्यापासून वंचित व्हावे लागले आहे.
आमगाव तालुक्यातील भौगोलिक परिक्षेत्र ३२१०५.६७ हे. आहे. यात बागाईत सिंचन जमिनीचे क्षेत्र ११८५१ हे. आहे. तर २१९३४.६८ हेक्टर जमीन पिकाखाली आहे. तालुक्यातील जलसिंचनाच्या साधनांमध्ये ३१ कालवे, तलाव ६१ व विहिरी १८०९ यात ११८५१ हेक्टर परिक्षेत्र व्यापले आहे. जलसिंचन स्त्रोतांचे साधने २९७ आहेत. परंतु या जलस्त्रांमध्ये स्थिर सिंचन स्त्रोत नाही. नदी, कालवे यांच्या पात्रातून वाहणारे पाण्यामुळे फक्त काही कालावधीपुरते जलसिंचन होते. परंतु बदलत्या वातावरणात हिवाळा व उन्हाळ्यामध्येच पाणी टंचाईला समोर जावे लागते. तर उपलब्ध जलस्त्रोत कमी पावसामुळे व सिंचन साधनांची उपयोगिता कालबाह्य झाल्यामुळे हे स्त्रोतही सिंचनासाठी उपयोगाचे ठरले नाही. आमगाव-सालेकसा हे तालुके राज्य सीमेवर आहेत. यात आमगाव तालुक्याची लोकसंख्या एकंदरीत एक लाख ५० हजारच्या जवळ पोहोचली आहे.
शेतकºयांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. परंतु दरवर्षी पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे शेतकºयांना व नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. अनेक शेतकरी सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे पीक घेण्यापासून वंचित होतात. त्यामुळे या परिक्षेत्रात मोठ्या सिंचन सुविधेसाठी उपलब्ध असलेल्या वाघनदीवर बंधारा बांधण्याची मागणी आहे. वाघ नदीवर बंधारा प्रकल्प उभारल्यास शेतकरी व नागरिकांना मुबलक पाणी, सिंचनासाठी पाणी मिळेल व पाणी टंचाईची समस्या मार्गी लागेल. यासाठी या प्रकल्पाचे प्रारूप प्रस्ताव सामाजिक कार्यकर्ते यशवंत मानकर यांनी तयार केले आहे. सदर प्रकल्पाचा प्रस्ताव शेतकरी व नागरिकांच्या हिताचा असल्याने या प्रस्तावाला मंजुरी मिळावी व निधी उपलब्ध व्हावा, यासाठी शेतकऱ्यांनी लेखी निवेदन शासनाकडे सादर केल्याची माहिती आहे.
प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यास शेतकऱ्यांना आधार
जलस्त्रोत वाहते असल्याने फक्त काही कालावधी पुरते सिंचनासाठी पाणी उपलब्ध होते. परंतु वर्षातील उर्वरित सलग दहा महिन्याच्या कोरड्या व ओसाड दुष्काळामुळे शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी मिळाले नाही. नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे या नदीवर बंधारा प्रकल्प उभारल्यास शेतकरी व नागरिकांना आधार मिळू शकेल. या प्रकल्पाचा प्रस्ताव भविष्यात अधिक फलदायी ठरणार आहे. या प्रकल्पाला शासनाने मंजुरी द्यावी म्हणून सामाजिक कार्यकर्ते यशवंत मानकर, महारीटोला येथील सरपंच भरतलाल बावनथडे, निर्जला टेंभरे (टाकरी), शोभा मेश्राम (गिरोला), मनोज ब्राम्हणकर (सुपलीपार), सुनील ब्राम्हणकर (भोसा), सुमेंद्र उपराडे (सावंगी), रेखा मच्छिरके (पिपरटोला), भेजलाल पटले (बाम्हणी), आशा बिसेन (ननसरी), खेमराज बावनकर (जामखारी), सुनिता तुरकर (अंजोरा) यांनी पुढाकार घेतला आहे.

Web Title: Build a bandage on the Wagh river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.