गोसेखुर्द नहराचे बंधारे भूमिगत बांधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:35 AM2021-03-18T04:35:18+5:302021-03-18T04:35:18+5:30
शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, याकरिता गोसेखुर्द उपसा सिंचनअंतर्गत पालांदूर परिसरामध्ये कालव्याचे काम करण्याचे नियोजित आहे. परंतु या कालव्याचे ...
शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, याकरिता गोसेखुर्द उपसा सिंचनअंतर्गत पालांदूर परिसरामध्ये कालव्याचे काम करण्याचे नियोजित आहे. परंतु या कालव्याचे काम भूमिगत पद्धतीने झाल्यास जेवणाळा येथील मैदान व कवडसी येथील गट क्रमांक १२९ ते १३५ मधील राहत्या घरांचे नुकसान शक्य आहे. त्यामुळे भूमिगत नहर बांधल्यास शेतकऱ्यांसह प्रभावित कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल.
नेरला उपसा सिंचन योजनाअंतर्गत पालांदूर वितरण कालव्याच्या साझा क्रमांक ३५१५ वरून जाणारे नहराचे बांधकाम भूमिगत पद्धतीने करण्याकरिता २४ जुलै २०१८ रोजी कार्यकारी अभियंता, गोसेखुर्द उपसा सिंचन, भंडारा यांना निवेदन दिले होते. परंतु सदर निवेदनानुसार अजूनपर्यंत कारवाई शून्य आहे.
जेवणाळा येथील गट क्रमांक १० सरकारी असून, सदर गट झुडपी जंगल व जनावरांना चराईकरिता आरक्षित आहे.
त्यामुळे १२९ ते १३५ मध्ये लोकांचे राहते घर आहे. सदर गटातून नहराचे बांधकाम भूमिगत न केल्यास त्यांच्या कुटुंबात असलेली लहान मुले तसेच त्यांच्या घरी असलेली जनावरे यांना अपघात होऊ शकतो. तसेच अनेक शेतकरी भूमिहीन होऊ शकतात. त्यामुळे नरहाचे बांधकाम भूमिगत पद्धतीने करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा ग्रामपंचायत, जेवणाळा व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनायक बुरडे यांनी व्यक्त केली आहे.