लोकवर्गणीतून बांधकाम केलेली इमारत मोजते शेवटची घटिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:34 AM2021-05-15T04:34:01+5:302021-05-15T04:34:01+5:30
लोकवर्गणीतून बांधकाम केलेली इमारत मोजते शेवटची घटिका प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील इमारत, जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष तुमसर : प्राथमिक ...
लोकवर्गणीतून बांधकाम केलेली इमारत मोजते शेवटची घटिका
प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील इमारत, जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष तुमसर : प्राथमिक आरोग्य केंद्र गोबरवाही येथील परिसरात ग्रामस्थांनी तीस वर्षांपूर्वी रुग्णाच्या नातेवाइकांना राहण्याकरिता लोकवर्गणी करून इमारत बांधकाम केले होते. सध्या ही इमारत धूळखात पडून असून दुर्लक्षामुळे शेवटची घटिका मोजत आहे. सध्याच्या काळात ती पाच ते सात लाखांची इमारत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष दिसत आहे.
तुमसर तालुक्यात येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सर्वांत जुने आहे. या आरोग्य या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना भरती करण्यात येते. पूर्ण भरती केल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांना पूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात एका मोठ्या वृक्षाखाली भोजन तयार करून तिथे राहत होते. पावसाळ्यात, उन्हाळ्यात रुग्णांच्या नातेवाइकांना मोठे कष्ट सहन करावे लागत होते. गोबरवाही येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी लोकवर्गणी १९८७ मध्ये सुरू केली. १९८९ मध्ये पाचशे वर्ग फूट आता पक्क्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. त्यामुळे कुणाचे नातेवाईक येथे भोजन करणे व दुपारच्या वेळेस आराम करीत होते. कालांतराने या इमारतीकडे जिल्हा परिषद प्रशासन दुर्लक्ष झाले. सध्या ही इमारत पडून आहे. ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून इमारत बांधकाम केले; परंतु जिल्हा परिषद प्रशासनाने या इमारतीच्या देखरेखीअभावी इमारत काही दिवसांनंतर पडण्याच्या मार्गावर दिसत आहे.
दहा बेड कोविड सेंटर तयार करावे. गोबरवाही येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून प्राथमिक केंद्राची स्वतंत्र इमारत आहे. ५०० वर्ग फुटांत बांधकाम असल्याने या ठिकाणी किमान दहा बेडचे कोविड सेंटर उभारावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.