शुक्राचार्य विद्यालयावर चालला बुलडोजर

By admin | Published: June 24, 2017 12:27 AM2017-06-24T00:27:12+5:302017-06-24T00:27:12+5:30

तालुक्यातील शेवटच्या टोकावरील असलेल्या मिरेगाव येथे २३ जूनला वनविभाग कार्यालय भंडारा यांनी कार्यवाही करून....

Bulldozer running on Shukracharya school | शुक्राचार्य विद्यालयावर चालला बुलडोजर

शुक्राचार्य विद्यालयावर चालला बुलडोजर

Next

मिरेगाव येथील प्रकरण : वनविभागाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यातील शेवटच्या टोकावरील असलेल्या मिरेगाव येथे २३ जूनला वनविभाग कार्यालय भंडारा यांनी कार्यवाही करून प्रतिभा शिक्षण संस्था कनेरीद्वारा संचालित शुक्राचार्य विद्यालय, मिरेगाव येथील वनजमिनीवरील असलेले शाळा इमारतीचे अवैध बांधकाम बुलडोझरने जमीनदोस्त केले.
मिरेगाव ता. लाखनी या ठिकाणी प्रतिभा शिक्षण संस्थेची शुक्राचार्य विद्यालय असून गेल्या अनेक वर्षापासून शाळेची इमारत आहे. मात्र सदर इमारत शाळेची की खाजगी मालकिची हे कोडे असल्यामुळे संभ्रमात होते. मिरेगाव येथील सार्इंद्रनाथ जवंजार याने माहितीच्या अधिकारा अंतर्गत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सत्य समोर आले. इमारत ही शाळेची नसून खाजगी असल्याचे व त्याची मालक नलिनी महोदव गजापुरे असल्याचे स्पष्ट झाले, असे असताना संस्था चालक हे शासनाकडून शासकीय अनुदान लाटत असतानाच शासकीय वनविकास व संवर्धन यांच्या मालकीची गट क्रं. ५८४ संरक्षीत वेन या जमिनीवर अतिक्रमण करून दोन मजली टोलेगंज इमारत उभी केली आणि शाळेच्या नावाखाली शासनाचा निधी लाटण्याचा काम केला. तक्रारदार सार्इंद्र जवंजार यांनी सतत अनेक वर्ष पाठपुरावा करून सत्य समोर आणले.
२३ जून रोजी वनकर्मचारी, राज्य राखीव दलाची तलाठी, तहसिलदार लाखनी यांच्यासह घटनास्थळी येऊन दोन जेसीबी व बुलडोझरच्या सहायाने शुक्राचार्य विद्यालयाची पक्की दुमजली इमारतीचे दोन मजले आणि अतिक्रमण केलेले बांधकाम पुर्णपणे भुसपाट केले. यावेळी साकोलीचे उपवनसंरक्षक गोखले, लाखनीचे आरएफओ कोळी, लाखनीचे तहसिलदार, नायब तहसिलदार मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस, ग्रामस्थ वनकर्मचारी उपस्थित होते.

वनविभागाने कुठलीही पुर्व सुचना न देता सदर बांधकाम पाडले आहे. ग्रा.पं. प्रशासन, तंमुस समिती सदर इमारत वैध असल्याचे मान्य केले आहे. ग्रामस्थांच्या विरोधात वनविभागाने कृत्य केले आहे. वनाधिकाऱ्यांना प्रकरण निश्चिपणे भोवणार आहे.
-सारंग गजापुरे, प्राचार्य
शुक्राचार्य विद्यालय मिरेगाव.

Web Title: Bulldozer running on Shukracharya school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.