बंधारा बांधकामात नियमाला बगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 09:31 PM2019-04-30T21:31:40+5:302019-04-30T21:32:59+5:30
दिघोरी (आमगाव)- शिंगोरी - धारगाव मार्गावरील नाल्यात बंधारा बांधकाम सुरु आहे. या बांधकामात नियमांना तिलांजली देण्यात येत असून ग्रामस्थ व शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सदर बांधकाम होत असल्याचा आरोप आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दिघोरी (आमगाव)- शिंगोरी - धारगाव मार्गावरील नाल्यात बंधारा बांधकाम सुरु आहे. या बांधकामात नियमांना तिलांजली देण्यात येत असून ग्रामस्थ व शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सदर बांधकाम होत असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी होत असलेले बांधकाम थांबवून चौकशी करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
शिंगोरी-धारगाव लगतच्या नाल्यावर जिल्हा परिषदेने मंजूरी दिलेल्या निधीतून बंधारा बांधकाम करण्यात येत आहे. सदर काम सुरु करण्यापुर्वी ग्रामपचांयत, ग्रामस्थ व शेतकऱ्यांना सुचना न देता अयोग्य ठिकाणी बांधकामाला सुरवात करण्यात आली.
शासकिय नियमानुसार काम सुरु करण्याची पुर्ण प्रक्रिया न करता संबंधित कामाचा तपशिलासह माहितीचे फलक लावण्यात आले नाही. तसेच या नाल्यावर बंधारा असताना नियमानुसार दोन बंधाºयांमधील अंतरही योग्य नाही. बंधारा बांधकाम योग्य ठिकाणी करावे, अशी मागणीही जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.