रेतीची चोरटी वाहतूक पाच वाहनांना पकडले
By admin | Published: November 8, 2016 12:31 AM2016-11-08T00:31:18+5:302016-11-08T00:31:18+5:30
मुंढरी (बुज) रेती घाटावरून रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतुक करणाऱ्या मुंढरी (बुज) येथील रेतीसह ३ ट्रॅक्टर पकडण्यात आले.
खनिकर्म विभागाची कारवाई : करडी पोलिसात गुन्हा दाखल
करडी (पालोरा) : मुंढरी (बुज) रेती घाटावरून रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतुक करणाऱ्या मुंढरी (बुज) येथील रेतीसह ३ ट्रॅक्टर पकडण्यात आले. याशिवाय अवैध वाहतुक करताना एक ट्रक ताब्यात घेण्यात आला. ही कारवाई रविवारला रात्री ८.३० ते ११ वाजताच्या सुमारास मोहाडीचे तहसिलदार धनंजय देशमुख, जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने केली.
ही सर्व वाहने करडी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून वाहन चालकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहाडीचे तहसिलदार धनंजय देशमुख व जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने मुंढरी (बुज) रेती घाटावरून रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतुक करित असताना मुंढरी येथील तीन ट्रॅक्टरवर कारवाई केली. यात श्रीकृष्ण मोतीराम देव्हारे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. ३६ एल. ६३५३, ट्रॉली क्रमांक एम.एच. ३६-२३९१ चालक अंगद शेंडे रा. मुंढरी, शकुंतला श्रीकृष्ण देव्हारे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. ३६ एल. ४७१९, ट्रॉली क्रमांक एम.एच. ३६-७७३८ चालक गणेश देवगडे रा.मुंढरी, श्रीकांत श्रीकृष्ण देव्हारे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर कमांक एम.एच. ३६ एच.३५१९, ट्रॉली क्रमांक एम.एच. ३६ जी.३२५२ चालक महेश शेंडे रा.मुंढरी यांचा समावेश आहे.
विना परवाना रेतीची अवैध वाहतुक करताना ट्रक क्रमांक एम.एच. ३६ एफ ६२१ या ट्रकवर कारवाई करण्यात आली. या वाहनाच्या चालकाने ट्रक सोडून पसार झाला.
ही कारवाई काल रात्री ८.३० ते ११ वाजता दरम्यान करण्यात आली. तहसिलदार व खनिकर्म अधिकारी यांच्या निर्देशानुसार मुंढरीचे तलाठी देवराम मरस्कोल्हे यांच्या तक्रारीवरून करडी पोलिसांनी भादंवि ३७९ कलमान्वये गुन्हा नोंदविला. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.१५ निलज बुज रेतीघाटावर नदी पात्रातून हमालाद्वारे रेती भरताना एक ट्रॅक्टर मोहगाव येथील तलाठ्यांनी पकडले. वाहन चालक रवी येळणे यांच्या माहितीवरून मोहगावचे तलाठी किर्ती अमृते यांच्या तक्रारीवरून राजू येळणे याच्याविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास करडी पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)