भंडारा येथे राज्य समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांच्या प्रतिमेचे दहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 02:09 PM2023-03-21T14:09:45+5:302023-03-21T14:10:50+5:30
काटकर यांनी घेतलेल्या निर्णयाचा असंतोष येथील कर्मचाऱ्यांमध्ये स्पष्टपणे दिसून आला
इंद्रपाल कटकवार
भंडारा : सोमवारी मुख्य्रंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर कर्मचारी संघटनेच्या राज्य समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली होती. या निर्णयाचा भंडारा जिल्ह्यात विरोध करीत मंगळवारी संपकरी कर्मचाऱ्यांनी काटकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून दहन केले. तसेच घोषणाबाजी केली.
काटकर यांनी घेतलेल्या निर्णयाचा असंतोष येथील कर्मचाऱ्यांमध्ये स्पष्टपणे दिसून आला. यावेळी कर्मचारी संघटनेचे जिल्हा समन्वयक रामभाऊ येवले यांनी, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या भरवश्यावर संप सुरू केला होता. त्यांनी संप मागे घेतला असल्याने नाईलाजास्तव आपल्याला कार्यालयात रुजू होणे आवश्यक असल्याचे सांगितले.