दिव्याची पेटती वात उंदराने पळविली अन् झाला घात!

By गोपालकृष्ण मांडवकर | Published: January 6, 2024 05:09 PM2024-01-06T17:09:17+5:302024-01-06T17:09:29+5:30

घराला लागलेल्या आगीत साहित्य जळून खाक.

burning wick of the lamp was run away by a rat and it was killed in bhandara | दिव्याची पेटती वात उंदराने पळविली अन् झाला घात!

दिव्याची पेटती वात उंदराने पळविली अन् झाला घात!

गोपालकृष्ण मांडवकर,भंडारा : सकाळच्या सुमारास माजघरात देवापुढे लावलेली दिव्याची पेटती वात उंदीर घेऊन गेल्याने घराला लागलेल्या आगीत साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली. ही घटना शनिवारी, दि. ६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास लाखांदूर येथील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये घडली. या घटनेत बुधेश्वर रघुनाथ रासेकर (४५) यांच्या घरासह घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

बुधेश्वर रासेकर हे आपली आई, पत्नी व २ मुलांसह मागील कित्येक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. दरम्यान, घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास बुधेश्वरने नेहमीप्रमाणे माजघरातील देव्हाऱ्यासमोर दिवा आणि अगरबत्ती लावून पूजा केली होती. काही वेळाने ते मजुरीच्या कामकाजासाठी घराबाहेर निघून गेला. बुधेश्वरची आई सुमित्रा घराबाहेर अंगणात कपडे धूत असताना घरातून धूर निघताना दिसला. तिने घरात जाऊन पाहिले असता घरातील जीवनावश्यक साहित्य जळत असल्याचे दिसून आले. त्यांनी आरडाओरड केल्याने गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेत त्यांच्या घरातील जीवनावश्यक साहित्य व नातवंडांची शालेय कागदपत्रे जळून खाक झाली. याप्रकरणी शासन, प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन नुकसानभरपाई मिळण्याची मागणी पीडित कुटुंबीयांनी केली आहे.

महसूल अधिकाऱ्यांनी केला घटनेचा पंचनामा :

घराला आग लागून घरातील साहित्य जळून खाक झाल्याची माहिती लाखांदूर महसूल विभागाला होताच लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांच्या मार्गदर्शनात तलाठी आशिष खामणकर व सहकारी खुशाल दिघोरे यांनी घटनास्थळी पोहोचत घटनेचा पंचनामा केला. या घटनेत पीडित इसमाचे जवळपास २५ हजार रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

Web Title: burning wick of the lamp was run away by a rat and it was killed in bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.