उभ्या ट्रकवर एसटी बस आदळून एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 01:09 AM2019-07-12T01:09:23+5:302019-07-12T01:10:06+5:30

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रेतीच्या ट्रकवर एसटी बस आदळून झालेल्या अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाल्याची घटना तुमसर तालुक्यातील कांद्री ते जांब रस्त्यावर गुरुवारी सकाळी ९.३० वाजता घडली.

A bus collided with a ST bus on a vertical truck | उभ्या ट्रकवर एसटी बस आदळून एक ठार

उभ्या ट्रकवर एसटी बस आदळून एक ठार

Next
ठळक मुद्देकांद्रीची घटना : बस चालकाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
जांब (लोहारा) : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रेतीच्या ट्रकवर एसटी बस आदळून झालेल्या अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाल्याची घटना तुमसर तालुक्यातील कांद्री ते जांब रस्त्यावर गुरुवारी सकाळी ९.३० वाजता घडली.
देवेंद्र नत्थु काळसर्पे (४२) रा. कामठी नागपूर असे मृताचे नाव आहे. तुमसर तालुक्यातील कांद्री ते जांब मार्गावर पंक्चर झाल्याने ट्रक (क्र. एम एच ३१ सीक्यू ९५६४) रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला. त्यावेळी तुमसर आगाराची बस क्रमांक एम एच ०७ सी ९५२४ ही तुमसरवरुन हिवराकडे जात होती. गुरुवारी सकाळी ९.३० वाजता चालकाचे नियंत्रण गेल्याने बस ट्रकवर जावून आदळली. त्यात ट्रकचा चालक देवेंद्र जागीच ठार झाला. देवेंद्र ट्रकच्या खाली शिरुन दुरुस्तीचे काम करीत होता. त्याचवेळी धडक दिल्याने तो ठार झाला. विशेष म्हणजे ट्रक नादुरुस्त असल्याने त्याच्या बाजूला दगड लावण्यात आले होते. परंतु एसटी चालकाने निष्काळजीपणे बस चालविल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. याप्रकरणी आंधळगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी बसच्या चालकाला अटक केली.

Web Title: A bus collided with a ST bus on a vertical truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात