बिबट्याचे रस्त्यावर बस्तान
By Admin | Published: January 23, 2017 12:17 AM2017-01-23T00:17:38+5:302017-01-23T00:17:38+5:30
नाकाडोंगरी वन परी क्षेत्र अंतर्गत बघेडा उपवन बिट आसलपानी पश्चिम कक्ष क्र १३ पी. एफ. मध्ये कारली ते आसलपानी मुख्य रस्त्यावर बिबटयाने सायंकाळच्या सुमारास एक तास ठाण मांडले.
नागरिक दहशतीत : वन विभागाने लक्ष देण्याची गरज
पवनारा : नाकाडोंगरी वन परी क्षेत्र अंतर्गत बघेडा उपवन बिट आसलपानी पश्चिम कक्ष क्र १३ पी. एफ. मध्ये कारली ते आसलपानी मुख्य रस्त्यावर बिबटयाने सायंकाळच्या सुमारास एक तास ठाण मांडले. बिबट्याचे सर्वात प्रथम दर्शन कारलीं येथील चंद्रकांत उइके यांना झाले. बिबट्याच्या उपस्थितीमुळे शाळकरी मुले व नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
आदिवासी बहुल गाव कारलीं व आसलपानी अतिशय जंगल व्याप्त भागात असून येथील विद्यार्थी व नागरिक बघेडा येथे ये जा करतात. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या आसलपानी मुख्य रस्त्यावर बिबट ठाण मांडून बसलेला असताना चंद्रकांत उइके यांना आढळताच सर्व ये जा करणाऱ्यांना सतर्क केले.
बिबट एक तास एकाच ठिकाणावर असल्यामुळे दहशत निर्माण झाली आहे.
विद्यर्थ्यांनी शिक्षणाकरिता बघेडा येथे जाण्यास नकार दिला. बिबट आढळल्यामुळे वन कर्मचारी च्या गस्तित वाढ करण्यात आले असून सांयकाळच्या सुमारास बिबट्याला पळवून लावण्यासाठी फटाके फोडण्यात येत आहे. नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे. वन विभागाने विशेष लक्ष देऊन बिबट चा बंदोबस्त करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)