फुलपाखरू, कीटक परिचय कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 10:44 PM2018-02-24T22:44:20+5:302018-02-24T22:44:20+5:30
येथील ग्रीनफ्रेन्डस् नेचर क्लब लाखनी तर्फे निसर्गातील सुंदर अशा फुलपाखरांचा परिचय व ओळख विद्यार्थ्यांना व्हावी याकरिता बटरफ्लाय व इन्सेक्ट ट्रेल अर्थात फुलपाखरु व कीटक परिचय कार्यक्रम घेण्यात आला.
आॅनलाईन लोकमत
लाखनी : येथील ग्रीनफ्रेन्डस् नेचर क्लब लाखनी तर्फे निसर्गातील सुंदर अशा फुलपाखरांचा परिचय व ओळख विद्यार्थ्यांना व्हावी याकरिता बटरफ्लाय व इन्सेक्ट ट्रेल अर्थात फुलपाखरु व कीटक परिचय कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात ग्रीनफ्रेन्डस् नेचर क्लबचे संघटक प्रा.अशोक गायधने, सिद्धार्थ विद्यालयाचे हरित सेना शिक्षक दिलीप भैसारे ग्रीनफ्रेन्डस्चे पदाधिकारी अशोक वैद्य, नितीन पटले, पंकज कावळे यांच्या मार्गदर्शनात सिद्धार्थ व समर्थ विद्यालयाचे विद्यार्थी शेंदरे नर्सरी येथे एकत्र जमल्यानंतर त्यांना विविध प्रजातींचे फुलपाखरे व किटकांचा विस्तृत व प्रत्यक्ष परिचय करून देण्यात आला.
ग्रीनफ्रेन्डस् संघटक प्रा.अशोक गायधने यांनी लाखनी शहरात विविध भागामध्ये यात शेंदरे नर्सरी, रेस्ट हाऊस, बसस्थानक व बाजार समिती परिसरात विद्यार्थ्यांसमवेत बटरफ्लाय ट्रेल करून घेतला.
यात विविध दोन प्रजातीपेक्षा जास्त फुलपाखरे व किटकांचा परिचय प्रत्यक्षरित्या करून देऊन त्यांचे रंग, रुप, आकार, वैशिष्ट्ये, इंग्रजी व मराठी नावे तसेच छायाचित्राद्वारे माहिती करून दिली.
यामध्ये कॉमन ग्रास यलो, लेमन पॅसी, चॉकलेट पॅन्सी, ब्लू पॅन्सी, बॅरोनेट, कॉमन क्रो, कॉमन रोज, लाईन बटरफ्लाय कॉमन वांडरर, डॅनाईड एगफ्लाय, ग्रेटर एगफ्लाय, कॉमन इव्हीनिंग, ब्राऊन, प्लेन टायगर, स्ट्राईक, सेरुलियन, कॉमन झिडाबिल तसेच कॉमन पियरो, कॉमन सिल्वरलाईन, ग्राम ब्लू, पिकॉक, पॅन्सी कमांडर, डेल्टने याचबरोबर ड्रॅगन फ्लाय, डॅन्सींग फ्लाय, लायन वर्म लार्वे, जायंट वुड, स्पायडर, फनेल वेब स्पायडर, टनेल वेब स्पाईडर, काही पतंग व किटकांचा प्रत्यक्ष परिचय त्यांनी विस्तृतरित्या उदाहरणाद्वारे बटरफ्लाय ट्रेलमध्ये करून दिला. याद्वारे त्यांनी फुलपाखरू निरीक्षण तंत्र, विद्यार्थ्यांना अवगत करून दिले. अभिनव असा हा बटरफ्लाय व इन्सेक्ट कार्यक्रम मागील १५ वर्षापासून सातत्याने ते घेत असतात. त्याद्वारे विद्यार्थ्यांना निसर्गाच्या जैवविविधतेविषयी विविध माहिती मिळत असते.
या कार्यक्रमात समर्थ विद्यालयाचे वजे्रेश मेश्राम, भूषण धांडे, रोहित देशमुख, वंश सदनवार, अमन लांजेवार तसेच सिद्धार्थ विद्यालयाचे आलोक शेंडे, रजत चाचेरे, प्रज्वल मोहनकर, आनंद चाचेरे, अल्पेश वालदे, प्रतीक राऊत, अरमान देढे, ओमप्रकाश खवसकर, जीवनदास सातपुते, रितेश निर्वाण, मयूर सिंगनजुडे, देवेंद्र नागदेवे, सागर टिचकुले, आशिष शहारे, निलेश राऊत तसेच समर्थ विद्यालयाचे कुंदन शेंदरे, ऋषीकेश तुमडाम, रोहित मडावी यांनी सहभाग नोंदविला.