दोन वर्षांत पूर्ण होणार बायपास रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:34 AM2021-03-16T04:34:53+5:302021-03-16T04:34:53+5:30

मुंबई ते कोलकता हा राष्ट्रीय महामार्ग भंडारा शहरातून जातो. नागपूरपासून मुजबीपर्यंत चारपदरी असलेला हा मार्ग भंडारा शहरात येताच दोन ...

The bypass road will be completed in two years | दोन वर्षांत पूर्ण होणार बायपास रस्ता

दोन वर्षांत पूर्ण होणार बायपास रस्ता

Next

मुंबई ते कोलकता हा राष्ट्रीय महामार्ग भंडारा शहरातून जातो. नागपूरपासून मुजबीपर्यंत चारपदरी असलेला हा मार्ग भंडारा शहरात येताच दोन पदरी होतो. त्यामुळे वाहतुकीचा मोठा ताण पडून आजवर अनेक अपघात झाले आहेत. सामान्य नागरिकांना जीव मुठीत घेऊनच जावे लागते. त्यामुळे नवीन बायपास रस्त्यासाठी वर्षभरापूर्वी खा. सुनील मेंढे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. ना. गडकरी यांनी नवीन बायपास रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली. अलीकडेच या कामाचे टेंडर निघाले आहेत. लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.

सहापदरी असलेल्या या बायपास रस्त्याची लांबी १४ किलोमीटर असणार आहे. यासाठी ५६.८९ हे. आर जमीन १३ गावांमधून संपादित करायची होती. आजिमाबाद, बेला, भिलेवाडा, दवडीपार, दिघोरी, गिरोला, हंसापूर, खापा, कोरंभी, पलाडी, सालेबर्डी, सिरसघाट, उमरी येथील जमिनीचे संपादनाचे काम सुरू झाले होते. त्यातील ९० टक्के भूसंपादनाची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित भूसंपादन लवकरच होणार आहे. या रस्त्याच्या प्रत्यक्ष बांधकामाचा खर्च ६१८.७५ कोटी रुपये असून भूसंपादन व युटिलिटी शिफ्टिंगसह ७३८ कोटी ६७ लाख रुपयांचा खर्च यावर होणार आहे.

असा असेल नवीन बायपास मार्ग

प्रस्तावित बायपास मार्ग शहापूर, बेलावरून वळण घेऊन तीर्थक्षेत्र कोरंभी येथे वैनगंगेवर नवीन पूल बांधून गिरोला, भिलेवाडा मार्गावर चारपदरी रस्त्याला मिळणार आहे. या बायपास रस्त्याचे काम पूर्ण होताच सर्व प्रवासी व माल वाहतूक येथून वळवली जाईल. त्यामुळे दुपदरी राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघाताला आळा घालता येणार आहे. या रस्त्यावर उड्डाणपूल, चार मोठे पूल, सहा लहान वाहन भूमिगत रस्ते, सर्व्हिस रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला चार बस थांबे राहणार आहेत.

Web Title: The bypass road will be completed in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.