मुदत संपल्यानंतरही घेतला हिशोब
By admin | Published: December 20, 2015 12:26 AM2015-12-20T00:26:48+5:302015-12-20T00:26:48+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीत सहभाग घेणाऱ्या उमेदवारांनी मुदतीच्या आत हिशोब सादर करण्याची अट असताना..
माहिती अधिकारात उघड : लिपीक अडचणीत
चुल्हाड (सिहोरा) : ग्रामपंचायत निवडणुकीत सहभाग घेणाऱ्या उमेदवारांनी मुदतीच्या आत हिशोब सादर करण्याची अट असताना गोंडीटोल्याचे विद्यमान सरपंचानी हिशोब सादर केला नाही. परंतु तुमसर तहसील कार्यालयातील लिपीकांनी मुदत संपली असतानी हिशोब स्वीकृत केल्याचे माहिती अधिकारात उघडकीला आले आहे. यामुळे निलंबनाची कारवाई करावी]अशी तक्रारकर्त्यांची मागणी आहे.
तुमसर तालुक्यातील गोंडीटोला गट ग्रामपंचायतची सर्वाधिक निवडणूक २५ जुलैला पार पडली आहे. या निवडणुकीत सहभाग घेणाऱ्या उमेदवारांना २७ आॅगष्ट २००५ पर्यंत हिशोब सादर करण्याचे नोटीसात बजाविण्यात आले आहे. निवडणूक निर्देश तथा नियमांचे भंग केल्यास विजयी उमेदवार यांचे विरोधात पदमुक्तची कारवाई करण्यात येणार असल्याचे या नोटीसात नमुद करण्यात आले होते.
या शिवाय सहा वर्ष निवडणुकीत उमेदवारी अर्ज सादर करता येणार नाही असे नमुद असताना निवडणुकीत सहभाग घेणाऱ्या उमेदवारांनी नियम व शर्तीचे उल्लंघन करीत वाटाण्याच्या अक्षदा लावल्या आहेत.
अशा उमेदवारांची तथा अपात्र उमेदवारांची यादी तुमसर तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिली आहे. या यादीत ६८ सहभागी उमेदवारांची नावे आहेत. परंतु बहुतांश उमेदवार निवडणुकीत पराभूत झाले असल्याने कारवाईसाठी पुढाकार घेण्यात आलेला नाही. परंतु गोंडीटोला ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच व महालगाव येथील एका विद्यमान सरपंचाचा यात समावेश असताना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पदमुक्तची कारवाई करणारे निर्देश दिले नाहीत.ं
तब्बल पाच महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असताना निवडणूक निर्देशांचे पालन व अंमलबजावणी जिल्हा निवडणूक अधिकारी करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
दरम्यान, गोंडीटोला येथील सामाजिक कार्यकर्ता सुनिल मेश्राम यांनी तुमसर तहसील कार्यालयात माहिती अधिकारातून या संदर्भातील कारवाई करीता विचारणा केली असता धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. गोंडीटोला गट ग्रामपंचायतच्या २५ जुलैला घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत १३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यापैकी सहा विजयी उमेदवारांनी ३० दिवसांचे आत उमेदवारी हिशोब सादर केल्याची माहिती देण्यात आली आहे. यात विद्यमान सरपंच राहांगडाले यांनी या निर्धारित कालावधीत हिशोब सादर केला नाही. विद्यमान सरपंच नंदलाल राहांगडाले यांनी ५ नोव्हेंबर २०१५ ला हिशोब सादर केला असता कनिष्ठ लिपीक मीनाक्षी चव्हाण व प्रशांत गजभिये यांनी स्वीकृत केला आहे. निवडणूक नियम व शर्तीला लिपिकांनीच बगल दिली आहे.या प्रकारात अर्थ घेवाण देवाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. निवडणूक निर्देश शर्ती व नियमांचे काटेकोर अंमलबजावणी खुद्द यंत्रणाच करीत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
असे असतानाही विद्यमान सरपंचावर पदमुक्तची कारवाई करण्यात आली नसल्याने न्यासाठी सुनील मेश्राम यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. जबाबदार यंत्रणा तथा हिशोब स्वीकृत करणारे लिपीक यांना कारवाईकरिता पात्र ठरविण्यात यावे असे याचिकेत नमुद करण्यात आले आहे. हिशोब सादर व स्वीकृत करण्याची मुदत संपली असताना लिपिकांनी तब्बल १ महिन्यानंतरही हिशोबाला स्वीकृत केले. यात आलबेल झाल्याचे दिसून येत आहे. या लिपीकावर निलंबनाची कारवाई करून गोंडीटोल्याचे विद्यमान सरपंच यांना तात्काळ पदमुक्त करण्याची मागणी सुनिल मेश्राम यांनी केली आहे. या संदर्भात प्रतिक्रियासाठी लिपीक प्रशांत गजभिये यांना संपर्क साधला असता होवू शकला नाही. (वार्ताहर)