आत्महत्याग्रस्त कुटुंबाना मदतीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:56 AM2019-08-18T00:56:32+5:302019-08-18T00:57:04+5:30
तालुक्यातील कोष्टी येथील अल्पभूधारक शेतकरी सेवकराम परसराम पंचबुध्दे (४६) यांनी सततच्या नापीकीला कंटाळत, कर्जापायी स्वत:च्या शेतावर कडुलिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दोन महिन्यापूर्वी कोष्टी येथे घडली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील कोष्टी येथील अल्पभूधारक शेतकरी सेवकराम परसराम पंचबुध्दे (४६) यांनी सततच्या नापीकीला कंटाळत, कर्जापायी स्वत:च्या शेतावर कडुलिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दोन महिन्यापूर्वी कोष्टी येथे घडली होती. सदर आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या मृत्युस कारणीभूत असलेल्या देव्हाडा येथील साखर कारखाना प्रशासनाने तात्काळ त्या मृतकांच्या कुंटुबियांना १५ लक्ष रुपये आर्थिक मदत करावी, अशी मागणी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
मृतक शेतकरी सेवकराम पंचबुध्दे यांनी आपल्या शेतातील अर्धा एकराचा ऊस माणस अँग्रो साखर कारखाना युनिट क्रमांक चारला विकला होता.परंतू सदर ऊस हा कारखान्यात मृतकाच्या नावावर न चढवता त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर चढवून एक प्रकारे फसवणूक करीत त्यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप मृतकांच्या कुंटुबियांना केला.
मृतक शेतकºयाने देव्हाडा माणस साखर कारखाना प्रशासनाला विकलेल्या ऊसाचा चुकारा हा वेळेवर मिळत नव्हता. सदर मोबदल्याविषयी वारंवार मागणी करूनही कारखाना प्रशासनाने मोबदला दिला नाही. त्यामुळे त्या शेतकºयाचे मानसिक संतुलन बिघडले. आता ऊसाचा मोबदला मिळणार नाही, कुटुबांचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, मुलांचे शिक्षण, पुर्वीच्या कर्जाची परतफेड कशी करायची, मुलींच्या लग्नाची चिंता या आर्थिक विवंचनेत तो सापडला होता. त्यामुळे त्यांनी नैराशाच्या खाईत लोटत आपल्या शेतावरील कडुलिंबाच्या झाडाला गळफास लावून स्वत:ची जिवनयात्रा संपवली.
त्यांच्या आत्महत्यामुळे कुटुंबियांवर संकट कोसळले आहे. मृतकाला माणस अँग्रो साखर कारखाना व्यवस्थापनाकडून वेळेवर ऊसाच्या चुकारा मिळाला असता तर त्याने मृत्युला कवटाळले नसते, त्यामुळे त्या आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मृत्युस देव्हाडा येथील साखर कारखाना प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांसमवेत मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडने केला आहे. त्यामूळे त्या आत्महत्याग्रस्त कुटूबियांना तात्काळ १५ लक्ष रूपयांचे आर्थिक मदत देण्याची मागणी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विश्वास बडवाईक, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश बालपांडे, कैलाश तितीरमारे, विक्रम कांबळे, प्रकाश नगरधने, अजय गौपाले, जितु सार्वे, कालीदास वनवे, आत्महत्याग्रस्त शेतकºयाची पत्नी, कुटुंब आदींनी जिल्हाधिकारी, तसेच कारखाना व्यवस्थापनाला दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी केली.
मागणीची पुर्ततान झाल्यास देव्हाडा साखर कारखानासमोर आत्महत्याग्रस्त कुटूबियांसमवेत जनआंदोलन करण्याचा ईशारा निवेदनातून दिला आहे.