घरकूल लाभार्थ्यांची बोळवण

By admin | Published: May 25, 2016 01:17 AM2016-05-25T01:17:12+5:302016-05-25T01:17:12+5:30

घरकुल लाभार्थ्याला शासनाकडुन घरकुलचा मोफत लाभ मिळत असला तरी प्रशासनाच्या चुकीमुळे वेळेवर देयेके मिळत नसल्याने नको रे बाबा घरकुल म्हनण्याची वेळ आली आहे.

Calling Beneficiaries Beneficiaries | घरकूल लाभार्थ्यांची बोळवण

घरकूल लाभार्थ्यांची बोळवण

Next

लाभार्थ्यांची पायपीट : ८६ लाभार्थ्यांच्या घरकुलाचा निधी गेला परत
प्रमोद प्रधान लाखांदूर
घरकुल लाभार्थ्याला शासनाकडुन घरकुलचा मोफत लाभ मिळत असला तरी प्रशासनाच्या चुकीमुळे वेळेवर देयेके मिळत नसल्याने नको रे बाबा घरकुल म्हनण्याची वेळ आली आहे. पुर्ण घरकुल बांधकामावर १ लक्ष १० हजार लिहिण्यास सांगितल्यानंतर १० हजार रुपये कमी मिळाल्याने आपली फसगत झाल्याची ओरड लाभार्थ्यांमधे सुरु आहे.
लाखांदूर तालुक्यात सन २०१४-१५ ला ५९१ घरकुल बांधकामाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. अनेक तांत्रिक अडचणीमुळे आता हे लाभार्थी आर्थीक अडचणीत सापडले आहेत. ईंदिरा आवास योजने अंतर्गत तालुक्यातील घरकुल लाभार्थ्याना १ लक्ष रुपयाचे अनुदान तसेच निर्मल भारत अभियान कडुन ४ हजार ६०० रुपये व महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ५ हजार ४०० रुपये शौचालय बांधकामाचे असे एकुण १ लक्ष १० हजाराचे अनुदान मिळणार म्हणुन लाभार्थी आनंदात होते. ५९१ लाभार्थ्यानी शासनाच्या निधिची प्रतिक्षा न करता आज ना उद्या निधि मिळेल म्हणु उसनवार व व्याजाने रक्कम काढुन घरकुल व शौचालयाचे बांधकाम पुर्ण केले. लाभार्थ्याला पहिला व दुसरा हप्ता उशिरा का होईना मिळाला. परंतु शेवटचा हप्ता अंतीम देयके मिळण्यासाठी आता पंचायत समीतीमध्ये पायपीट करावी लागत आहे.
पंचायत समिती कार्यालयात जावुन अधिकची माहिती घेतली असता त्या ८६ लाभार्थ्यांच्या घरकुल बांधकामाचा निधी मार्च एंडिंग मुळे शासनाकडे परत गेला असुन आता तो निधी मिळणार की नाही याबद्द्ल बोलण्यास एकही अधिकारी व कमर्चारी पुढे येत नसल्याचे दिसुन येत आहे. स्वत: लाभार्थ्याने उसनवार करुन पुर्ण केलेल्या घरकुल बांधकामाचा मिळणार की नाहि म्हणुन लाभार्थी संभ्रमावस्थेत आहे. त्या ८६ घरकुल लाभार्थ्यांची दररोज पंचायत समिती कार्यालयात पायपीठ सुरु एकुण घेणारा कुणीही नसल्याने घरकुल नको रे बाबा म्हणन्याची वेळ त्यांचेवर येवुन ठेपली आहे.

फक्त एक लाखाचा निधी मिळाला
घरकूल बांधकामाबद्द्ल दुसरा प्रकार गंभीर आहे. इंदिरा आवास योजने अंतर्गत तालुक्यातील घरकुल लाभार्थ्याना १ लक्ष रुपयाचे अनुदान तसेच निर्मल भारत अभियान कडुन ४ हजार ६०० रुपये व महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ५ हजार ४०० रुपये शौचालय बांधकामाचे असे एकुण १ लक्ष १० हजाराचे अनुदान मिळणार म्हणून लाभार्र्थी आनंदात होते. परंतु घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर फक्त १ लाखाचा निधी लाभार्थ्याला देण्यात आला. घरकुलावर शासनाचे माहिती फलक व मिळणारे अनुदान लिहिण्यात आले. एकिकडे १ लक्ष १० हजाराच्या निधितुन घरकुलाचे बांधकम झाल्याचे घरकुलावर असताना १० हजाराचा निधी कमी का देण्यात आला. असा प्रश्न लाभार्थ्याला पडला. या संदर्भात पंचायत समिती कार्यालयात सदर प्रतिनीधीने माहिती घेतली असता कुणीही बोलण्यास सक्षम दिसून आले नाही. यासंदर्भात उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे योजना फसवी कि अधिकारी फसवे असा प्रश्न लाभार्थ्यापुढे नक्कीच पडला. मार्च एंडिंग मुळे परत गेलेला निधी परत लाभार्थ्याला मिळणार काय व उरलेला १० हजाराचा निधी मिळणार का म्हणुन लाभार्थी प्रतीक्षेत आहेत.

Web Title: Calling Beneficiaries Beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.