शिवतीर्थावरील शिबिर ही ज्ञानसमृद्धीची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 10:09 PM2018-02-14T22:09:35+5:302018-02-14T22:10:31+5:30

माणस मुळातच दुबळा नसतो. त्या प्रसंगानुरूप दुबळा बनतो. त्यासाठी त्यांना सुसंस्करित विकासाभीमुख गुणवत्ताचे शिक्षण देणे व घेणे गजरेचे आहे आणि ते या महाशिवरात्रीनिमित्त येथे लावलेल्या सर्व विभागाच्या कामातून मिळेल.

Camp on Shivtirtha This garden of knowledge building | शिवतीर्थावरील शिबिर ही ज्ञानसमृद्धीची बाग

शिवतीर्थावरील शिबिर ही ज्ञानसमृद्धीची बाग

Next
ठळक मुद्देसंजय देशमुख : झिरी, नांदोरा येथील महाशिवरात्रीनिमित्त शिबिरात मार्गदर्शन

आॅनलाईन लोकमत
जवाहरनगर : माणस मुळातच दुबळा नसतो. त्या प्रसंगानुरूप दुबळा बनतो. त्यासाठी त्यांना सुसंस्करित विकासाभीमुख गुणवत्ताचे शिक्षण देणे व घेणे गजरेचे आहे आणि ते या महाशिवरात्रीनिमित्त येथे लावलेल्या सर्व विभागाच्या कामातून मिळेल. चुकतो हे कळत नाही पण चुका म्हणजे उरलेले धन आहे. मनुष्य शब्दविर नसावा, कृती विर असावा, याकरिता शिवतीर्थावरील ज्ञान समृद्धीरूपी बागेतून विचाराचे धन घ्यावे, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा, शासकीय कार्यालय व झिरी देवस्थान पंचकमेटी यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर प्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख बोलत होते. शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले. यावेळी पोलीस अधीक्षक विनिता शाहु, सहायक समाजकल्याण आयुक्त आशा कवाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवि धकाते, प्रभारी सहायक कामगार आयुक्त उ.सु. लोया, सामान्य रुग्णालयाचे डॉ. जैयस्वाल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी.पी. नायगांवकर उपस्थित होते. विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राचे भौगोलिक, सामाजिक समस्या वेगवेगळ्या आहेत. इतर जिल्ह्यापेक्षा भंडारा जिल्ह्याच्या मागण्या वेगळ्या आहेत. नैसर्गीक संपन्न मात्र मागासलेपणाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. याला दूर सारण्यासाठी शाषवत समतोल विकासानुसार प्रयत्न करावे. दरडोई उत्पन्न सोबत सामाजिक विकास हा उद्देश पुढे ठेऊन सर्व भाविक भक्तांनी झिरी येथील सर्व विभागाची माहिती घ्यावी, असे उद्घाटकीय भाषणात जिल्हाधिकारी सुहास दिवसे म्हणाले. पोलीस अधीक्षक विनिता शाहु यांनी, जिल्ह्यात तरूणाईवरील गुन्हाचे प्रमाण जास्त आहे. मुला-मुलींना कायद्याची जान असावी. याकरिता पोलिसाचे सहकार्य घ्यावे, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी फिरते पोलीस स्टेशन व जनजागृती रथाचा लाभ घ्यावा पोलिसाला मित्र समजावे याप्रसंगी जिल्हा विविध सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, सामान्य रुग्णालय समाजकल्याण कार्यालय व महामंडळे, सामाजिक न्याय भवन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, कामगार आयुक्त कार्यालय, महिला व बालविकास कार्यालय, जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय, उप वनसंरक्षक कार्यालय, तहसील कार्यालय, आरोग्य विभाग, रोजगार हमी विभाग, पंचायत समिती, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा कौशल्य विकास कार्यालय, महिला बाल कल्याण आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, महिला आर्थिक विकास महामंडळ, माहिती अधिकारी कार्यालयाचे योजना विषयी स्टॉल लावण्यात आले होते. याप्रसंगी भाविक भक्तांनी या ज्ञानरूपी विकास बागेला भेट देण्यात आले. प्रास्ताविक व संचालन दिवानी न्यायाधीश रासजे भट्टाचार्य यांनी केले.

Web Title: Camp on Shivtirtha This garden of knowledge building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.